Land Acquisition Agrowon
ॲग्रो विशेष

Bhakti Mahamarg : शेगाव-सिंदखेडराजा भक्ती महामार्ग रद्द करा

Shegaon-Sindkhedraja Higway : सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गासाठी शेतजमिनी अधिग्रहित केल्या जाणार असून, या शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहेत.

Team Agrowon

Buldana News : सिंदखेडराजा ते शेगाव या भक्ती महामार्गासाठी शेतजमिनी अधिग्रहित केल्या जाणार असून, या शेतकऱ्यांमधून मोठ्या प्रमाणात विरोध होऊ लागला आहेत. गावागावांत शेतकरी विरोधाचे फलक लावत आहेत.

याची दखल घेत महायुती सरकारमधील सिंदखेडराजा मतदार संघाचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तातडीने पत्र देत शेतजमिनीचे अधिग्रहण थांबवावे व हा भक्ती महामार्ग रद्द करावा अशी मागणी केली आहे.

जिल्ह्यात सिंदखेडराजा ते शेगाव असा भक्ती महामार्ग तयार केला जाणार आहे. हा महामार्ग समृद्धीला जोडला जाणार असून, यामुळे मुंबईकडून येणाऱ्यांना सोयीचे होणार आहे. परंतु या महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात जमिनीचे अधिग्रहण करावे लागणार आहे.

यात उपजाऊ जमिनी जाणार असल्याची भीती शेतकऱ्यांत वाढली. सिंदखेडराजा, देऊळगावराजा, चिखली, खामगाव, शेगाव या तालुक्यांतील ४३ गावांतील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी यासाठी अधिग्रहित करण्यात येत आहे.

या अधिग्रहण सूचनेमुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष तयार झाला. प्रस्तावित भक्ती महामार्गामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात भूमिहीन होणार आहेत. सदर ४३ गावांतील शेतकऱ्यांचा या भक्ती मार्गाला विरोध आहे.

‘ॲग्रोवन’ची दखल

शेतकरी आंदोलने करीत असून याला ‘ॲग्रोवन’ने ठळक प्रसिद्धी दिली. याची दखल आता शासकीय यंत्रणा, लोकप्रतिनिधीही घेत आहेत. हा मुद्दा येत्या लोकसभा निवडणुकीत अडचणीचा ठरण्याची शक्यता वाढते आहे. त्यामुळे सर्वच जण आता या संवेदनशील मुद्यावर शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू लागले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू बाजारात नरमाई; केळीला उठाव, कापूस दरावर दबाव, गवार तेजीत, तर ज्वारीला मागणी कायम

Ganeshotsav 2025: माटवी सजविण्याच्या खरेदीकरिता ग्राहकांची झुंबड

Alu Blight Disease: अळू पिकावरील करपा रोगाचे व्यवस्थापन

Kharif Sowing 2025: सांगली जिल्ह्यात खरीप पेरणी ९५ टक्क्यांवर

Onion Cultivation: खानदेशात कांदा पीक स्थिती बरी; पावसामुळे सिंचन बंद

SCROLL FOR NEXT