Neral News : खोपोली-शहापूर-मुरबाड हा राष्ट्रीय महामार्ग कर्जत तालुक्यातून गेला आहे. यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यात आल्या, मात्र काहींना १२ वर्षांनंतरही मोबदला मिळालेला नाही.
त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले असून मोबदला मिळाला नाही, तर रस्त्यावर लागवड करू, असा इशारा देण्यात आला आहे. अशीच भूमिका कल्याण, मुरबाड येथील शेतकऱ्यांनी घेतल्याने महामार्गातील भूसंपादनाचा वाद चिघळण्याची शक्यता आहे
कर्जत-मुरबाड हा आधी एकपदरी मार्ग होता. सरकारने २०११ मध्ये खोपोली, हाळ फाटा ते कर्जत, मुरबाड, शहापूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ अ घोषित करण्यात आला. त्यासाठी अधिसूचनाही प्रसिद्ध करण्यात आली. मात्र हाळ फाटा ते कर्जत फाट्यापर्यंत काम करताना शेतकऱ्यांच्या जमिनीचे भूसंपादन करण्याआधीच ठेकेदाराने काम सुरू केले.
यात ज्या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नाही, त्यांनी रस्ता अडवून ठेवला. त्यामुळे ठेकेदाराने उपलब्ध जागेनुसार रस्ता तयार केला. परिणामी आजही ९० किमी लांबीच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. महामार्गामुळे शेतजमीन बाधित झालेले हाळ फाटा ते कर्जत वर्णे येथील शेतकरी १२ वर्षांपासून मोबदल्यासाठी लढा देत आहेत. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष होत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.