Land Encroachment  Agrowon
ॲग्रो विशेष

Encroachment : शासकीय जमिनीवर अतिक्रमण करणाऱ्यांचे सदस्यत्व रद्द करा

Government Land Encroachment : हा प्रकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलमाचे १४(१)(जे-३) उल्लंघन करणारा असल्याने वरील संबंधितांना सदस्यपदी राहण्याचा हक्क राहिलेला नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

Team Agrowon

Nashik News : येवला तालुक्यातील डोंगरगाव येथील शासकीय जमीन गट नं. १३ वर अतिक्रमण करून बेकायदा दुकाने बांधून व्यवसाय करणाऱ्या येथील सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य यांचे सदस्यत्व रद्द करून त्यांना पुढील ६ वर्षांसाठी ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यास अपात्र घोषित करावे, अशी मागणी करणारी याचिका जिल्हाधिकाऱ्यांकडे दाखल करण्यात आली आहे.

डोंगरगाव येथील ग्रामस्थ कैलास सोमासे, साहेबराव सोमासे व अशोक पगारे यांनी वकील एकनाथ ढोकळे यांच्यामार्फत ही याचिका दाखल करण्यात आली आहे.

याचिकेत म्हटले आहे, की डोंगरगाव येथील सरपंच उज्ज्वला रमेश ढोकळे यांनी पती रमेश ढोकळे व सासरे कचरू ढोकळे, उपसरपंच गौतम बाळू पगारे यांनी आपल्या वडील बाळू पगारे, सदस्य ज्ञानेश्वर केशव सोमवंशी यांनी आपले वडील केशव सोमवंशी व भाऊ योगेश व अनिल सोमवंशी, सदस्य भीमाबाई तात्यासाहेब ढोकळे यांनी आपला मुलगा साईनाथ ढोकळे, सदस्य शारदा मारुती सोमासे यांनी पती मारुती सोमासे यांच्यामार्फत वरील जमिनीवर अतिक्रमण करून बेकायदा बांधकामे करून त्या ठिकाणी दुकाने थाटली आहेत.

हा प्रकार महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम कलमाचे १४(१)(जे-३) उल्लंघन करणारा असल्याने वरील संबंधितांना सदस्यपदी राहण्याचा हक्क राहिलेला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. वकील एकनाथ ढोकळे यांनी सांगितले, की नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित जमिनीवरील सर्व अतिक्रमणे चार महिन्यांत हटविण्यात यावीत, असे आदेश दिलेले आहेत.

उच्च न्यायालयातील सुनावणीत ग्रामपंचायत डोंगरगाव यांच्या वतीने ग्रामसेवक यांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते, त्यात ही जमीन शासकीय जमीन असल्याचे स्पष्टपणे मान्य केले आहे. सरपंच, उपसरपंच व सदस्य हे लोकसेवकही आहेत. त्यांनीच शासकीय जमिनीवर अतिक्रमण केल्याने त्यांना या पदावर राहण्याचा हक्क नाही व त्यांच्यावर कारवाई व्हावी म्हणून याचिका दाखल केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Milk Adulteration: भेसळयुक्त दूध आरोग्यासाठी धोकादायक; घरच्या घरी तपासा दुधातील भेसळ

River Linking Project: दुष्काळमुक्तीकडे वाटचाल, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला ७८ टीएमसी पाणी मिळणार- मुख्यमंत्री फडणवीस

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार, कापूस स्थिर, टोमॅचो आवक सुधारली, डाळिंबाला उठाव, मिरचीला उठाव टिकून

Land Acquisition: ‘शक्तिपीठ’साठी पारदर्शक भूसंपादन हवे

NA Permission Rule: शेतजमिनीवर घर बांधण्यासाठी ‘NA’ परवानगीची अट रद्द ; राज्य सरकारचा निर्णय

SCROLL FOR NEXT