Social Media Viral Banner Agrowon
ॲग्रो विशेष

Election Update : आफ्रिकेत प्रचार करा, तिथल्या शेतकऱ्यांची मते आयात करा

Social Media Viral Update : इथे प्रचार करण्यापेक्षा आफ्रिकेत जाऊन प्रचार करा आणि काजूबरोबरच तिथल्या शेतकऱ्यांची मतेही आयात करा, अशा आशयाचे जिल्ह्यातील फलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Team Agrowon

Sindhudurg News : तुम्हाला भारतीय काजू उत्पादकांची गरज नसेल तर आता शेतकऱ्यांनाही तुमची गरज नाही. इथे प्रचार करण्यापेक्षा आफ्रिकेत जाऊन प्रचार करा आणि काजूबरोबरच तिथल्या शेतकऱ्यांची मतेही आयात करा, अशा आशयाचे जिल्ह्यातील फलक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरू आहे. प्रचाराची रणधुमाळी रंगात आली असताना सोशल मीडियावर काजू उत्पादकांचे फलक चांगलेच चर्चेत आले आहेत. या फलकावर काजू उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा कधी समजून घेणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

‘आफ्रिकन काजू बीवरील आयातशुल्क कमी करणाऱ्या व मागील पाच वर्षांत काजू बी दराच्या प्रश्नावर आवाज न उठविणाऱ्या लोकप्रतिनिधींनो, तुम्हाला भारतीय काजू उत्पादक शेतकऱ्यांची गरज नसेल तर आता शेतकऱ्यांनाही तुमची गरज नाही. इथे प्रचार करण्यापेक्षा आफ्रिकेत जाऊन प्रचार करा आणि काजूबरोबरच तिथल्या शेतकऱ्यांची मतेही आयात करा, असा मजकूर या फलकांवर आहे.

याशिवाय २०१९ मध्ये काजू बीचा दर प्रतिकिलो १६० रुपये होता तर २०२४ मध्ये काजू बीचा दर ११५ रुपये असल्याचा उल्लेख आहे. समस्त काजू उत्पादक शेतकरी असादेखील उल्लेख असून हे फलक सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

जिल्ह्यातील काजू उत्पादक गेली दोन वर्षे काजू बीच्या दराबाबत विविध पातळ्यांवर आंदोलन करीत होते. आयात शुल्क वाढवावे, काजू बीला प्रतिकिलो २०० रुपये हमीभाव द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी काजू उत्पादक आग्रही होते. त्यातून हे फलक व्हायरल झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत काजू उत्पादकांची भूमिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT