Loksabha Election : नगर जिल्ह्यात लोकसभेला पंचाहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल

Election Update : नगर जिल्ह्यात यंदा लोकसभेला पंचाहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल, असे नियोजन करत आहोत, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिली.
Loksabha Election
Loksabha ElectionAgrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात मागील लोकसभेला घसरलेला मताचा टक्का, यंदाही आतापर्यंत झालेल्या लोकसभा मतदार संघांतील अनेक भागांत मतांची झालेली कमी आकडेवारी पाहता नगर जिल्ह्यात यंदा लोकसभेला पंचाहत्तर टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल, असे नियोजन करत आहोत, अशी माहिती जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी दिली.

सालीमठ म्हणाले, की लोकसभा निवडणुकीसाठी २३ जानेवारी रोजी अंतिम मतदार यादी जाहीर करण्यात आली होती. नगर जिल्ह्यात ३६ लाख ११ हजार ९६ मतदार होते. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या १० दिवसांपूर्वी मतदार नोंदी अभियान राबविण्यात आले. या पुरवणी यादीत ४८ हजार १०५ नव्याने मतदार वाढले आहेत.

Loksabha Election
Loksabha Election 2024 : मतविभाजनाचा फायदा कोणाला?

आता ३६ लाख ५९ हजार २०१ मतदार झाले आहेत. त्यांना १३ मे रोजी लोकसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करता येणार आहे. नव्याने मतदार नोंदणी झाल्याने आता मतदार संघासाठी ३६ लाख ५९ हजार २०१ मतदार झाले आहेत. अहमदनगर लोकसभा मतदार संघात १९ लाख ५४ हजार ९७०, तर शिर्डी मतदार संघात १६ लाख ५४ हजार १२६ मतदार आहेत. यामध्ये पुरुष १८ लाख ७३ हजार ७९८, तर महिला १७ लाख ३७ हजार १०१ मतदार होते.

Loksabha Election
Lok Sabha Election 2024 : टपाली मतदानास १,६६२ मतदारांची पसंती

मतदान केंद्रांवर अशा असतील सुविधा

गर्भवती माता, लहान मुले असलेल्या माता, दिव्यांग मतदान केंद्रांवर आल्यावर त्यांना रांगे उभे रहावे लागणार नाही. त्यांची तत्काळ मतदानाची प्रक्रिया राबविली जाईल.

मतदान केंद्रांवरील इतर वर्ग खोल्यांत मतदारांची बसण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

रांगेत उभे राहण्याची गरज नाही. स्थानिक पातळीवर कूलर आणि फॅन उपलब्ध झाल्यास मतदार केंद्रात लावले जाणार आहेत.

पिण्याचे पाणी, प्रथमोपचार आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. उन्हाची तीव्रता अधिक आहे. मतदान यंत्रात बिघाड झाला तर तातडीने उपायोजना करता यावी यासाठी ३७४ सेक्टर अधिकारी नियुक्त आहेत.

प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. राजकीय, समाजीक क्षेत्रातील लोकही सर्वांनी मतदान करण्याचे अवाहन करत आहेत. मतदानाचा टक्का वाढावा, उन्हाचा त्यावर परिणाम होऊ नये यासाठी प्रशासन सुविधा देणार आहे.
सिद्धराम सालीमठ, जिल्हाधिकारी, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com