PM Kisan Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan : राज्यभर ‘पीएम किसान’ प्रमाणीकरणासाठी मोहीम सुरू

PM Kisan KYC : पंतप्रधान (पीएम) किसान सन्मान निधी प्रमाणीकरणासाठी राज्यभर मोहीम सुरू झाली आहे.

मनोज कापडे

Pune News : पंतप्रधान (पीएम) किसान सन्मान निधी प्रमाणीकरणासाठी राज्यभर मोहीम सुरू झाली आहे. बुधवार (ता. २१)पर्यंत चालणाऱ्या या मोहिमेमुळे सार्वजनिक सुविधा केंद्रात (सीएससी) जाऊन प्रमाणीकरण करता येणार आहे.

लाभ घेण्यास पात्र असूनही केवळ ‘केवायसी’ न झाल्यामुळे राज्यातील लाखो शेतकरी अद्यापही ‘पीएम किसान’ योजनेपासून वंचित आहेत. यापूर्वी ६ डिसेंबर २०२३ ते १५ जानेवारी २०२४ दरम्यान राज्यात स्वतंत्र मोहीम राबविली गेली होती. त्यामुळे एक लाख शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रमाणीकरण झाले. तसेच तीन लाख शेतकऱ्यांची नव्याने नोंदणी झाली होती.

राज्यात अद्यापही दोन लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे. परिणामी, या शेतकऱ्यांना सध्या लाभ मिळत नाही. प्रमाणीकरण, नव्याने नोंदणी करणे किंवा बँक खाते आधार क्रमांकास जोडणे या तीनही कामांसाठी शेतकऱ्याने समक्ष हजर असणे बंधनकारक करण्यात आले आहे. बँक खाते आधार संलग्न करायचे असल्यास शेतकऱ्यांनी जवळच्या टपाल कार्यालयात आधार संलग्न खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, राज्यात दहा दिवसांची विशेष मोहीम यशस्वी करण्यासाठी कृषी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सर्व जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

या मोहिमेत ई-केवायसीचे प्रमाणीकरण न झालेल्या असलेल्या शेतकऱ्यांना सामाईक सुविधा केंद्रापर्यंत जाण्यास सांगितले जात आहे.

तेथील ग्रामस्तरीय समन्वयक अधिकाऱ्याने प्रमाणीकरण पूर्ण करणे अपेक्षित आहे. शेतकरी स्वतःदेखील भ्रमणध्वनीवरील ओटीपी, सामाईक सुविधा केंद्र, पी. एम. किसान फेस ऑथेंटिकेशन ॲप यापैकी कोणत्याही एका सेवेमार्फत प्रमाणीकरण करू शकतात.

..तरच मिळणार १६ वा हप्ता

कृषी आयुक्तालयाच्या म्हणण्यानुसार, केंद्राचा ‘पीएम किसान’चा १६ वा हप्ता या महिन्याच्या अखेरीस मिळण्याची शक्यता आहे. केंद्राचा हप्ता मिळालेल्या शेतकऱ्यांनाच राज्याच्या ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेचा लाभ मिळेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी सध्या सुरू असलेल्या मोहिमेचा लाभ घ्यावा. याबाबत अडचण असल्यास कृषी सहायक, पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करता येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT