Maharashtra Bandh  Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Bandh : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र बंदची हाक; जरांगेंची तब्बेतही खालावली

Maratha Reservation : मराठा आरक्षणाची अंमलबाजावणी व्हावी या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील गेल्या पाच दिवसापासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांनी उपचार घेण्यास विरोध केला आहे. दरम्यान मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यभर आज बंदची हाक देण्यात आली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अनेक वर्षांपासून लढा दिला जात आहे. यावरून वेळो वेळी अनेक आंदोलने झाली आहेत. तर राज्यभरात लाखोंच्या संख्येचे मराठा आक्रोश मोर्चे देखील निघाले आहे. पण आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे शेवटची लढाई लढायची आणि जिंकायचीच म्हणत पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसले आहेत.

त्यांचा उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून त्यांची तब्बेत खालावत चालली आहे. यावरून मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ राज्यात आज बुधवारी (१४ रोजी) बंदची हाक देण्यात आली आहे.

जरांगे पाटील यांची तब्बेत खालावली

मराठा आरक्षणाची अंमलबाजावणी व्हावी या मागणीसाठी जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे अस्त्र काढले आहे. गेल्या पाच दिवसापासून ते अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान त्यांची तब्बेत खालावली असून त्यांच्या नाकातून रक्तस्राव सुरु झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

तर या घटनेची माहिती मिळताच उपोषणस्थळी आरोग्य पथक दाखल झाले आहे. मात्र जरांगेंनी उपचारास नकार दिला आहे. यावेळी नाकातून रक्त येणे हे गंभीर लक्षण असल्याचे आरोग्य पथकातील डॉक्टरांचे म्हणणे आहे.

राज्यात बंदची हाक

दरम्यान मराठा समाजाच्या आरक्षणात होणाऱ्या चालढकलीवरून राज्यात विविध ठिकाणी बंदची हाक देण्यात आली आहे. याचे पडसाद सोलापूर आणि जालण्यात पाहायला मिळाले. उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. तर मराठा आरक्षणाची अंमलबाजावणी सरकारने करावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

जालन्यात कडकडीत बंद

सोलापूरसह जालना जिल्हात सुद्धा कडकडीत बंद पुकारण्यात येणार असल्याची माहिती सकल मराठा समाजाच्या वतीनं देण्यात आली आहे. यादरम्यान येथील जालना ते भोकरदन या मुख्य महामार्गावर मंगळवारी रात्री दहा वाजता मराठा आंदोलकांनी टायर जाळत रस्ता रोको आंदोलन केलं होते. तर भोकरदनमध्ये देखील आरक्षणासाठी बंद पाळण्यात आला.

धाराशीव, आळंदी आणि लातूर

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी उपोषण करणाऱ्या जरांगे पाटील यांना विविध ठिकाणावरून पाठिंबा मिळत आहे. राज्यात आज विविध जिल्ह्यात बंदची हाक देण्यात आली असून धाराशीव जिल्ह्यात आज कडकडीत बंद असणार आहे. तर आळंदी आणि लातूरमध्ये देखील बंद पुकारण्यात आला आहे. धाराशीवमध्ये आज सकाळपासूनच दुकाने बंद ठेवत व्यापाऱ्यांनी बंदला पाठिंबा दिला आहे.

येथेही बंदची हाक

राज्यभर मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बंदची हाक देण्यात आली असून सकल मराठा समाजाच्यावतीने हिंगोलीत देखील बंद पाळण्यात येणार आहे. याबरोबरच वसमत, औंढा नागनाथसह सेनगाव, कळमनुरीत बाजार पेठा बंद ठेवण्यात येणार आहेत.

विशेष अधिवेशन पुढे ढकलले

मराठा समाजाच्या आरक्षणावरून राज्य शासन अलर्ट मोडवर आले आहे. राज्य सरकारकडून याबाबत राज्य मागास आयोगाकडून सर्वेक्षण केले जात आहे. तर ते अंतिम टप्प्यात आले आहे. तर आयोगाचा अहवाल लवकरच सरकारला देण्यात येईल अशी चर्चा सुरू होती. तर हा अहवाल १५ फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात सादर केला जाईल अशीही चर्चा होती. मात्र सरकारने विशेष अधिवेशन हे पुढे ढकलले आहे. आता हे अधिवेशन २० तारखेला होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT