Micro Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Micro Irrigation Subsidy: सूक्ष्म सिंचन घटकाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

MahaDBT Application: राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ (सूक्ष्म सिंचन) योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींनी महाडीबीटी पोर्टलवर सूक्ष्म सिंचन घटकाकरिता अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News: राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ (सूक्ष्म सिंचन) योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील लाभार्थींनी महाडीबीटी पोर्टलवर सूक्ष्म सिंचन घटकाकरिता अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या घटकांकरीता ‘प्रथम अर्ज, प्रथम लाभ’ या तत्त्वावर लाभार्थीची निवड करण्यात येणार आहे. सूक्ष्म सिंचन (तुषार व ठिबक सिंचन) घटकाकरिता अनुदान व पूरक अनुदान देण्यात येते. यामध्ये अनुसूचित जाती-अल्प व अत्यल्प भूधारक करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना ५५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदान २५ टक्के, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना पूरक अनुदान १० टक्के असे एकूण अनुदान ९० टक्के,

तर अनुसूचित जातीतील बहूभूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना प्रति थेंब अधिक पीक मधून ४५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदान ३० टक्के, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना पूरक अनुदान १५ टक्के असे एकूण ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

अनुसूचित जमातीतील अल्प व अत्यल्प भूधारक करिता राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ ५५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदान २५ टक्के, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना पूरक अनुदान दहा टक्के असे एकूण अनुदान ९० टक्के, तर बहूभूधारक शेतकऱ्यांना राष्ट्रीय कृषी विकास योजना ‘प्रति थेंब अधिक पीक’ ४५ टक्के, मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना पूरक अनुदान ३० टक्के, बिरसा मुंडा क्रांती योजना पूरक अनुदान १० टक्के असे एकूण ९० टक्के अनुदान देण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत विविध कृषी योजनांचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbt.maharashtra.gov.in/Farmer/AgriLogin/AgriLogin वर ऑनलाइन अर्ज करावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Double Income : भाजपचा स्वभावच शेतकरीविरोधी; अखिलेश यादवांची शेतकरी प्रश्नांवरून टीका

Manoj Jarange Patil: 'मरण आलं तरी चालेल...'; मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघाले

Marathwada Water Project: मराठवाड्याचा पाणीप्रश्न ऐरणीवर

Mushroom Farming Success Story: अथक प्रयत्नांमधून मशरूमला तयार केले मार्केट

Maratha Protest: मुंबईला आंदोलनासाठी एकटाच जाणार : जरांगे

SCROLL FOR NEXT