Nashik DCC Bank Agrowon
ॲग्रो विशेष

Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँक कर्जवाटपात दोषी संचालकांवर गुन्हा दाखल करावा

Co-Operative Bank : शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवाटपात अनियमतता झाली असेल, तर दोषींवर कारवाई व्हायलाच हवी.

Team Agrowon

Nashik News : शेतकऱ्यांची अर्थवाहिनी असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्जवाटपात अनियमतता झाली असेल, तर दोषींवर कारवाई व्हायलाच हवी. त्यात माजी संचालक असतील किंवा अगदी मी दोषी आढळलो, तरी माझ्याविरोधातही गुन्हा दाखल करा, अशी परखड भूमिका मांडत कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीचे समर्थन केले.

आर्थिक अडचणीत असलेल्या जिल्हा बँकेने कर्जवसुली मोहीम हाती घेतली आहे. याविषयी कृषिमंत्री अॅड. कोकाटे म्हणाले, की जिल्हा बँकेकडे पैसे नसल्याने ठेवीदारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र, शेतकरी कर्ज भरत नाहीत.

उलट ही कारवाई थांबविण्यासाठी काही शेतकरी मला भेटले. कारवाई थांबविणे अवघड असून, त्यातून काही तरी कायदेशीर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. कर्जवाटपात दोषी संचालकांवर कारवाई झालीच पाहिजे. अगदी मी दोषी असेन तर माझ्यावर कारवाई करा, असे कोकाटे म्हणाले.

कर्जमाफीचा विषय माझा नाही

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा विषय माझ्या आखत्यारित येत नसून, त्याविषयी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री निर्णय घेतील. शेतकरी कर्जमाफीत दोन गट आहेत. त्यातील एक गट सातत्याने कर्ज भरतो. मग आमच्यावर अन्याय का, अशी त्यांची भावना आहे; तर दुसरा गट थकबाकीदारांचा आहे. आत्महत्येची वेळ आली, कर्जमाफ करा, असे त्यांचे म्हणणे असते. याविषयी सरकार योग्य निर्णय घेईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MPSC Exam Postponed: २१ डिसेंबरला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली

Maharashtra Cold Wave: राज्यात ३ दिवस थंडीची लाट; राज्यातील बहुतांशी भागात थंडीचा कडाका पुन्हा वाढला

Rabi Sowing: चंद्रपुरात रब्बी लागवड क्षेत्र पोहोचले ५३ हजार हेक्टरवर 

Local Governance Member: सटाण्यात ८५ ग्रामपंचायत सदस्य अपात्र

Ajwain Farming: खारपाणपट्ट्यासाठी ओवा पीक फायदेशीर

SCROLL FOR NEXT