Nashik DCC Bank : नाशिक जिल्हा बँकेला हवे ६३५ कोटी ‘शेअर्स कॅपिटल’

Co-Operative Bank : आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस वाचविण्यासाठी प्रशासनाने ६३५ कोटींचा ‘शेअर्स कॅपिटल’चा अंतिम प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे.
Nashik DCC Bank
Nashik DCC BankAgrowon
Published on
Updated on

Nashik News : आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस वाचविण्यासाठी प्रशासनाने ६३५ कोटींचा ‘शेअर्स कॅपिटल’चा अंतिम प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. बँकेने यापूर्वी सादर केलेल्या प्रस्तावातील त्रुटी निकाली निघाल्याने बँकेला ‘शेअर्स’च्या माध्यमातून ऊर्जितावस्था मिळण्याची शक्यता बळावली.

जिल्हा बँक शेतकऱ्यांची अर्थवाहिनी समजली जाते. नोटाबंदीनंतर ही बँक आर्थिक अडचणीत सापडली आणि अपेक्षित कर्जवसुली होत नसल्याने बँकेचे आर्थिक चक्रच रुतून बसले आहे. बँकेने आजवर वितरित केलेल्या कर्जापैकी ८० टक्के कर्ज ५६ हजार लोकांकडे संस्था पातळीवर अडकले.

Nashik DCC Bank
Nashik DCC Bank : पीककर्ज, सक्तीच्या वसुली विरोधात शेतकरी संतप्त

त्याची मुद्दल एक हजार ३५ कोटी रुपये आणि व्याजासह सुमारे एक हजार ३०० कोटी रुपये होते. या कर्जासह इतर कर्जदारांकडे जिल्हा बँकेचे तब्बल दोन हजार ३०० कोटी रुपये थकीत आहेत. कर्जदारांकडून पैसे वसूल करण्यास प्रशासकांना कायदेशीर अडचणी निर्माण केल्या जातात, तर दुसरीकडे कर्जदारांना कर्जमाफीची अपेक्षा लागून आहे.

Nashik DCC Bank
Nashik DCC Bank : सचिवांचा असहकार; नाशिक जिल्हा सहकारी बँकेची वसुली ठप्प

या दुहेरी चक्रव्यूहातून बाहेर पडण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमांनुसार ‘कॅश रिझर्व्ह रेशो’ (सीआरआर) करण्यासाठी बँकेला ६३५ कोटींची आवश्‍यकता आहे. त्यादृष्टीने जिल्हा बँकेने ‘नाबार्ड’च्या माध्यमातून यासंदर्भातील प्रस्ताव शासनाकडे सादर केला. यात काही त्रुटी असल्याचे सांगत प्रस्ताव पुन्हा बँकेकडे पाठविला होता. बँकेने कागदपत्रांची पूर्तता करून अंतिम प्रस्ताव पाठविला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास बँकेच्या अडचणी सुटण्यास मदत होईल.

दरम्यान, जिल्हा बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी अरविंद शिंदे यांनी नियुक्ती झाली आहे. त्यांनी यापूर्वी नांदेड येथे काम केले असून, रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेने त्यांची नियुक्ती झाली. बुधवारी (ता. १) त्यांनी बँकेत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. सर्वसमावेशक आणि बँकेच्या हिताचे काम करण्यास आपण कटिबद्ध राहणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.

जिल्ह्यातील शेतकरी कर्जदारांना आजही कर्जमाफीची अपेक्षा आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी कर्जमाफीची घोषणा होण्याची शक्यता होती. मात्र, आता निवडणूक झाली तरी कर्जमाफी झालेली नाही. आता शेतकऱ्यांनी कर्जमाफीची अपेक्षा ठेवण्यापेक्षा बँकेला सहकार्य करण्याची गरज आहे. व्याजापोटी शेतकऱ्यांवरील बोजा दरवर्षी वाढत चालला आहे.
- अरविंद शिंदे, व्यवस्थापकीय संचालक, जिल्हा बँक, नाशिक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com