Calendar Agrowon
ॲग्रो विशेष

कॅलेंडरचं पान...

बाहेरच्या तापमानापेक्षा घरातलं तापमान मला जरा जास्तच जाणवलं. उन्हातून आल्यावर पंख्याखाली बसलं तर थोड्या वेळेत आपल्या शरीराचं तापमान नॉर्मल होतं;

टीम ॲग्रोवन 

सहजच मित्राच्या घरी गेलो. दरवाजा बंद होता पण आत मात्र जोरजोरात बोलण्याचा आवाज येत होता. न राहवूनच बेल वाजवली तसा आवाज बंद झाला आणि उसनं हसू आणत मित्राने दरवाजा उघडला. वहिनीसाहेबही जरा फणकाऱ्यातच पाणी आणायला किचनमध्ये गेल्या. थोडा वेळ स्मशान शांतता. बाहेरच्या तापमानापेक्षा घरातलं तापमान (Temperature) मला जरा जास्तच जाणवलं. उन्हातून आल्यावर पंख्याखाली बसलं तर थोड्या वेळेत आपल्या शरीराचं तापमान नॉर्मल होतं; असं समजून मी आपल्या दोन-चार फुटकळ विनोदाच्या फैरी झाडून पाहिल्या. पण फारसा उपयोग झाला नाही. उकाड्याचा दाह इतक्या लवकर थांबेल; असं काही वाटेना. निघावं असं वाटत असताना एक फोन आला. त्यांना माझ्या कार्यक्रमाची तारीख हवी होती. मी मित्राला म्हटलं, ‘कॅलेंडर कुठंय?’ तसे ते दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. मला समोरच्या भिंतीवर कॅलेंडर दिसलं. मी ते खाली घेतलं व समोरच्याने सांगितलेली तारीख शोधत असताना माझ्या लक्षात आलं, की महिना संपून दोन दिवस झाले तरी कॅलेंडरचे (Calendar) पान अजून बदललेले नाही. मी ते बदललेही आणि समोरच्या व्यक्तीला कार्यक्रमाच्या अपेक्षित तारखेचा होकार दिला. पुन्हा कॅलेंडर जागेवर लावून दिले. तसे ते दोघेही माझ्याकडे पाहून जोरात हसू लागले.

मला कळेना नेमके काय झाले. कारण थोड्या वेळापूर्वी मी सांगितलेल्या विनोदावर यांच्या चेहऱ्याची एक रेषाही हलली नाही. पण आता काहीही न करता हे का हसतायेत? माझा गोंधळ पाहून मित्रच म्हणाला, ‘धन्यवाद मित्रा; कॅलेंडरचे पान बदलल्याबद्दल. ते कोणी बदलायचं यावरूनच आमचा वाद झाला होता. मला तर यावर हसावं की रडावं; असं झालं. पान बदलणं इतकं अवघड असतं? मित्रांनो, कॅलेंडर आपल्याला शिकवते की योग्य वेळी पान बदला. पण आपण मात्र ते पान कोणी बदलायचे; यावरून वाद घालत असतो. प्रत्येक पानावर जशी आपल्या सुख-दुःखाची नोंद असते तशी ती मान-अपमानाचीही असते. वेळेत पान न बदलल्यास ती अधिक ठळक होत जाते. ती नोंद दिवसेंदिवस जखमा करत राहते, घायाळ करत राहते. म्हणून वेळेत पान बदला. मागील पानावरून पुढे जाताना नव्या तारखेच्या नव्या रकान्यात नवं आणि सकारात्मक काही लिहिण्याचा प्रयत्न करा. वर्षभरात कॅलेंडरची जशी रद्दी होते; तशी तुमच्याही हेव्यादाव्यांची, मानापमानाचीही करा. नवं कॅलेंडर मागचं सगळं पुसून टाकण्यासाठीच तर असतं!

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Issue: तरुण शेतकऱ्याने विविध मागण्यांसाठी घेतली नदीत उडी; शेतकरी बेपत्ता,प्रशासनाकडून शोध मोहीम सुरू

Wildlife Terror : खरिपात वाघासोबत हत्तींची दहशत

Nanded Fertilizer Scam : जैविक खतांच्या थेट विक्रीप्रकरणी चौकशी सुरू

Viksit Bharat Scheme: तरुणांना १५ रुपये बोनस देणार; १ लाख कोटींची विकासित भारत योजना आजपासून सुरु

Fishing Season : नव्या हंगामात दर्यातून मासळीचे घबाड

SCROLL FOR NEXT