Eknath Shinde 
ॲग्रो विशेष

Cabinet Meeting : दमणगंगा-गोदावरी नदीजोड प्रकल्पास मान्यता; मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकी दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड योजनेस मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.१४) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली.

Dhananjay Sanap

विधानसभेची निवडणूक तोंडावर आली आहे. त्यामुळे सर्वसमाज घटकांना खुश करण्यासाठी राज्य सरकारकडून निर्णयाचा धडका लावण्यात आला आहे. राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकी दमणगंगा एकदरे गोदावरी नदीजोड योजनेस मान्यता देण्याचा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (ता.१४) राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. सह्याद्री अतिथीगृह येथील या बैठकीसाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. या बैठकीत १८ निर्णय घेण्यात आले.

दमणगंगा-एकदरे-गोदावरी या योजनेतून मराठवाड्यातील १० हजार ११ हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ होईल.  तसेच ६८.७८६ दलघमी पाणी सिंचनासाठी, १३.७६ दलघमी पाणी पिण्यासाठी आणि ९.१७ दलघमी पाणी उद्योगासाठी उपलब्ध होणार आहे. यापूर्वी दुष्काळग्रस्त मराठवाड्यासाठी कोकणातून पाणी वळविण्याच्या योजनांना मान्यता देण्यात आली आहे.

आंतरराज्यीय  दमणगंगा-पिंजाळ, नदीजोड प्रकल्प व नारपार गिरणा नदी योजना, पार – गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी, दमणगंगा-एकदरे-गोदावरी या नदीजोड प्रकल्पांना राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राबविण्याचे ठरले आहे. या प्रकल्पाची किंमत २ हजार २१३ कोटी रुपये आहे.

दमणगंगा वैतरणा गोदावरी नदीजोड योजनेच्या १३ हजार ४९७ कोटी २४ लाख किंमतीच्या प्रकल्पास देखील मान्यता देण्यात आली.  हा प्रकल्प दमणगंगा आणि वैतरणा उपखोऱ्यातील ५.६८ टीएमसी अतिरिक्त पाणी स्थानिक वापरासाठी तसेच नाशिक जिल्ह्यातील अवर्षणप्रवण सिन्नर तालुका आणि मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या लाभक्षेत्राला याचा लाभ होईल.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय संक्षिप्त

१) आष्टी उपसा सिंचन योजनेस सुधारित मान्यता

२) वैजापूरच्या शनीदेवगाव बंधाऱ्यास प्रशासकीय मान्यता

३) राज्य शेती महामंडळाची जमीन एमआयडीसीला हस्तांतरित

४) किल्लारीच्या शेतकरी सहकारी कारखान्याचे कर्ज व्याजासह माफ

५) अडचणीतील सहकारी उपसा जलसिंचन योजनांचे थकीत कर्ज माफ

६) मुंबईतल्या ५ प्रवेश मार्गांवरील पथकर (टोल) हलक्या वाहनांसाठी माफ. आज रात्रौ १२ वाजेपासून अंमलबजावणी.

७) आगरी समाजासाठी महामंडळ

८) समाजकार्य महाविद्यालयांमधील अध्यापकांना करिअर ॲडव्हान्समेंट स्किम

९) पाचपाखाडी येथील जमीन ठाणे मनपास प्रशासकीय भवनासाठी

१०) खिडकाळी येथील जमीन हायब्रिड स्किल विद्यापीठासाठी विनामूल्य

११) राज्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी ) २.० राबविणार

१२) पुणे मेट्रो रेल टप्पा-२ मधील रेल्वे मार्गिंकांच्या कामांना मान्यता

१३) मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इमर्जन्सी मेडिसिनची ३ पदे

१४) खंड क्षमापित झालेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना जुनी पेन्शन योजना

१५) मराठी भाषेविषयक जनजागृतीसाठी पंधरवडा

१६) अण्णासाहेब जावळे मराठवाडा विकास मंडळ

१७) ‘उमेद’साठी अभ्यासगट

१८) कौशल्य विद्यापीठास रतन टाटा यांचे नाव

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Production Policy: चारा उत्पादन धोरण राबवविणार: राधाकृष्ण विखे पाटील

CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची पडताळणी सुरू

NAFED Kharedi: नाफेडच्या खरेदी बंदमुळे हरभरा उत्पादक अडचणीत

Crop Insurance: पीकविमा भरपाईसाठी ‘हाहाकार मोर्चा’

Fake Seeds: बियाणे, खते, कीटकनाशकांचे ११८ नमुने अप्रमाणित

SCROLL FOR NEXT