cabinet meeting  Agrowon
ॲग्रो विशेष

NAMO Shetkari Yojana : शेतकऱ्यांना मिळणार दिवाळी बोनस ; नमो योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी

Namo Shetkari Sanman Nidhi Yojana : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेला मंत्रिमंडळाची मंजुरी दिली आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2 हजाराचा पहिला हप्ता जमा होणार आहे.

Swapnil Shinde

Maharashtra Cabinate Meeting : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत नमो शेतकरी महासन्मान निधी (namo shetkari mahasanman nidhi) योजनेच्या पहिल्या हप्त्याला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता दिवाळीला शेतकऱ्यांच्या खात्यात राज्य सरकारच्यावतीने (Maharashtra Government) २ हजार रुपये जमा करण्यात येणार आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या (PM-Kisan Samman Nidhi) धर्तीवर महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा केली. पीएम किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ६ जमा केले जातात. त्याचप्रमाणे आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या (Farmer) खात्यामध्ये तीन हप्त्यांमध्ये २ हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी आज मंत्रिमंडळाच्या (Maharashtra governments) बैठकीत एप्रिल २०२३ ते जून २०२३ या कालावधीसाठीच्या पहिल्या हप्त्याला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. यासाठी १ हजार ७२० कोटी कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी केंद्र सरकारच्या माध्यमातून ६ हजार रुपये दिले जातात. ही रक्कम दर ४ महिन्यांच्या अंतराने ३ हप्त्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केली जाते. आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर १४ हप्ते जमा झाले आहेत. तसेच, सरकारने १५ व्या हप्त्यासाठी नोंदणी सुरू केली आहे. महाराष्ट्रात ८५ कोटी ६६ लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Union Budget: शेती आणि पूरक उद्योगासाठी ‘अर्थपूर्ण’ पाऊल

Water Sector Budget: जलक्षेत्रासाठी दीर्घकालीन तरतुदींवर भर

Agriculture Budget 2026: कोरडवाहू शेतीत कृषी संलग्न व्यवसायाला चालना

Agri Union Budget 2026: अन्नदाता शेतकऱ्यांचा भ्रमनिरास

Union Budget 2026: शेती बेदखलच!

SCROLL FOR NEXT