Butterfly Festival Agrowon
ॲग्रो विशेष

Butterfly Festival : सिंधुदुर्गात २० ऑक्टोबरपासून फुलपाखरू महोत्सवांचे आयोजन

Latest Marathi News : या महोत्सवाच्या पत्रकाचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि अभिनेता दिगंबर नाईक यांच्या हस्ते सोमवारी(ता.१६) प्रकाशन करण्यात आले.

एकनाथ पवार / ॲग्रोवन वृत्तसेवा

Sindhudurg News : फुलपाखरांचे गाव म्हणून पारपोली (ता. सावंतवाडी) ची राज्यात ओळख निर्माण व्हावी, या हेतुने वनविभाग आणि पारपोली संयुक्त वन व्यवस्थापन समितीतर्फे २० ते २३ ऑक्टोबर या कालावधीत फुलपाखरू महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवाच्या पत्रकाचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि अभिनेता दिगंबर नाईक यांच्या हस्ते सोमवारी(ता.१६) प्रकाशन करण्यात आले. पारपोलीची ओळख फुलपाखरांचे गाव म्हणून होऊ लागली आहे. ही ओळख जगभरात पोचावी, या साठी सावंतवाडी वनविभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून हा फुलपाखरू महोत्सव होईल. या दरम्यान एका वेळी किमान ८० पर्यटकांना जंगल सफारी करता येईल. पर्यटकांना फुलपाखरू प्रजाती, प्रजातींची ओळख आणि त्यांचे महत्त्व सांगितले जाईल. पारपोली ते आंबोली अशी पायवाट आहे. त्या पायवाटेने भ्रमंती करता येईल.

या महोत्सवाला पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, जिल्हाधिकारी किशोर तावडे, कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक आर. एम. रामानुजग, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसरक्षंक नवकिशोर रेड्डी, सुनील लाड आदी उपस्थित राहतील.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Supriya Sule : आमदार विकत घेता येतात, मग शेतकऱ्यांसाठी पैसे का खर्चत नाही

Voting Awareness : अकलूजला मानवी साखळीद्वारे मतदान जनजागृती

Krushna Valley Water : कृष्णा खोऱ्यातील पाणी डिसेंबरअखेर तुळजापुरात

Sugarcane Season 2024 : ‘कादवा’चे यंदा साडेचार लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Water Storage : सांगलीतील प्रकल्पांत ८१ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT