Bullock Cart Race Sangli agrowon
ॲग्रो विशेष

Bullock Cart Race Sangli : सांगली जिल्ह्यात बैलगाडी शर्यतीचा थरार, हेलिकॉप्टर बैज्या-बुलेट छब्या पटकावली २२ लाखांची थार

Double Maharashtra Kesari Chandrahar Patil : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या वतीने अंबाबाई देवीच्या यात्रा व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.

sandeep Shirguppe

Sangli Bullock Cart Race : डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्या वतीने अंबाबाई देवीच्या यात्रा व बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या बैलगाडी शर्यतीला लाखांहून अधिक बैलगाडी शर्यतीमध्ये महाराष्ट्रातील व कर्नाटक मधील शर्यती शौकिनांनी पाहण्यासाठी हजेरी लावली. सांगली जिल्ह्यीतल हरोली-देशिंग या माळावर रविवार(ता.२९) रोजी पार पडल्या.

या बैलगाडी स्पर्धेत (ता. अथणी, जि. बेळगाव) येथील हेलिकॉप्टर बैज्या-बुलेट छब्या या बैलजोडीने प्रथम क्रमांक मिळवत २२ लाखांची ‘थार’ गाडी जिंकली; तर कोल्हापूर येथील हरण्या आणि तांबडा हरण्या या बैलजोडीने द्वितीय क्रमांक पटकावत ट्रॅक्टरचे मानकरी ठरले.

मागील काही वर्षात दसऱ्याच्या निमीत्ताने मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यतीचे मैदान भरले जायचे. मात्र ही बैलगाडी शर्यत बंद झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनंतर डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी याच माळावर मोठ्या प्रमाणात बैलगाडी शर्यत भरवल्या होत्या. या शर्यतीसाठी हजारो शौकिनांनी उपस्थिती दर्शवली होती.

बैलांची तपासणी करून बैलगाडा शर्यत

बैलांची तपासणी करून डॉक्टरांनी फिटनेस प्रमाणपत्र दिल्यावर बैलगाडी शर्यती सोडण्यात आल्या. या माळावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेना खासदार संजय राऊत, भास्कर जाधव, प्रा. नितीन बानगुडे-पाटील, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, आदित्य ठाकरे यांचे मोठे डिजिटल लावण्यात आल्याने तेथील वातावरण पूर्णपणे राजकीय बनले होते. शौकिनांना बसून शर्यती पाहण्यासाठी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. तसेच या ठिकाणी मोठे स्क्रीन लावण्यात आले होते. तसेच शर्यतीच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात व्यावसायिकांची उपस्थिती होती.

बैलगाडा प्रेमींसाठी बक्षिसांची खैरात

महाराष्ट्र-कर्नाटक राज्यातून अनेक बैलगाडी स्पर्धक व शर्यती शौकीन भरउन्हात शर्यती पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.  वेगवेगळ्या गटातून पार पडलेल्या शर्यतीनंतर चुरशीच्या अंतिम जनरल बैलगाडी शर्यती हेलिकॉप्टर बैज्या आणि बुलेट छब्या या बैलजोडीनं प्रथम क्रमांकाची ‘थार’ गाडी पटकावली. कोल्हापूरच्या हरण्या बैलजोडीनं द्वितीय क्रमांक मिळवत ट्रॅक्टरचा मानकरी झाला. यामध्ये थार, ट्रॅक्टर, बुलेट मोटारसायकल, मोटर सायकल अशी बैलगाडी शर्यतीमध्ये बक्षिसे ठेवण्यात आली होती. या परिसरामध्ये पहिल्यांदाच या बक्षिसासह शर्यती पार पडल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Corridor Maharashtra : ‘टायगर कॉरिडॉर’च्या निर्णयाविरोधात याचिका दाखल

Weather Station : हवामान केंद्राची उंची दहा मीटर करा ः स्वाभिमानी शेतकरी संघटना

Crop Loan : पीककर्ज वाटपावर कर्जमाफीचे सावट

Jat Water Storage : जतमध्ये पाणीसाठ्यात १६ टक्क्यांनी वाढ

AI In Sugarcane : ऊस शेतीत ‘एआय’ वापरासाठी ‘केडीसीसी’कडे अर्ज करा

SCROLL FOR NEXT