Agriculture Mechanization : शेतीच्या कामासाठी सुलभ यांत्रिकिकरण आवश्‍यक

Agriculture Labor Shortage : शेतीमध्ये मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे शेतीची कामे कमी वेळेत व सुलभतेने करण्यासाठी यांत्रिकीकरणाची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी केले.
Agriculture News
Agriculture News Agrowon
Published on
Updated on

Akola News : शेतीमध्ये मजुरांची कमतरता भासत असल्यामुळे शेतीची कामे कमी वेळेत व सुलभतेने करण्यासाठी यांत्रिकीकरणाची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे यांनी केले.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा व सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनिअर्स, इंडिया, तिफन २०२५ आणि जॉन डीअर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तिफन २०२५’ (टेक्नॉलॉजी इनोव्हेशन फोरम फॉर अग्निकल्चरल नर्चरिंग) ही विदर्भस्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या वेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. काळबांडे बोलत होते.

Agriculture News
Agriculture Mechanization : सुलभ यांत्रिकीकरण, शेतीमालावर प्रक्रियेला महत्त्व

या वेळी डॉ. प्रमोद बकाने, डॉ. अनंत मानकर, डॉ. अनिल कांबळे, प्रा. प्रशांत गावंडे, डॉ. वैभवकुमार शिंदे, डॉ. धीरज कराळे, डॉ. परिष नलावडे, संदीप नागे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Agriculture News
Agricultural Mechanization Scheme : कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी २७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी वितरित

महिला इंजिनिअर शिवानी खंडार यांनी प्रास्ताविकात या कार्यक्रमाची कल्पना व उद्देश मांडला. या स्पर्धेची तयारी कशी करावी याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सूचना केल्या. रोहन जगदाडे, मल्हार चणियारा, विघ्नेश्वर सुबाश, स्वराज करंबेलकर, कृष्णा कलात्रे यांनी भाजीपाला रोप लावणी यंत्र विकसित करण्यासाठीची संरचना तसेच विविध भागांची रचना तयार करण्यासाठी विविध सॉफ्टवेअर वापरून डिझाईन करण्याबाबतचे सादरीकरण केले.

या कार्यशाळेत नागपूर, अमरावती, शेगाव, जळगाव, अकोला अशा ११ विविध अभियांत्रिकी महाविद्यालयातील एकूण १८० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. भाजीपाला रोपे लावण्यासाठीचे यंत्र तयार करण्यासाठी नवीन कल्पना मांडण्यासाठी एकूण ४५ मिनिटांचा वेळ सहभागी विद्यार्थ्यांना देण्यात आला. त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनांचे सादरीकरण केले. डॉ. अनिल कांबळे यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com