Farmer Protest
ॲग्रो विशेष

Farmer Protest : परभणीत बैलगाडी मोर्चा तर जायकवाडीत जलसमाधी आंदोलन; राज्यात काय घडलं?

सोयाबीन, कापसाला दर मिळत नसल्यानं सोमवारी परभणीतील जिंतूर तालुक्यात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानं तहसिल कार्यालयासमोर निदर्शने केली.

Dhananjay Sanap

बातमी पीएम किसानच्या निधी वाढबद्दलची!

केंद्रीय कृषीमंत्री अर्जुन मुंडा यांनी मंगळवारी लोकसभेत एका लेखी उत्तरात पीएम किसान सन्मान योजनेच्या निधी वाढ करण्याचं मानस नसल्याची माहिती दिली. पीएम किसान योजनेतून दरवर्षी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ६ हजार रुपये मदत म्हणून जमा केले जातात. केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी पीएम किसान योजनेच्या निधीत वाढ होईल, अशी चर्चा होती. पण अर्थसंकल्पात पीएम किसान योजनेबद्दल नवीन तरतूद करण्यात आली नाही. तसेच आताही पीएम किसानच्या निधीत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा कोणताही इरादा नसल्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केलंय. 

बातमी शेतकऱ्यांच्या बैलगाडी मोर्चाची!

सोयाबीन, कापसाला दर मिळत नसल्यानं सोमवारी परभणीतील जिंतूर तालुक्यात शेतकऱ्यांचा बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानं तहसिल कार्यालयासमोर निदर्शने केली. शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. सोयाबीन आणि कापसाला दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाही. त्यामुळे मराठवाडा विदर्भातील शेतकरी आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊनच राष्ट्रवादी कॉँग्रेस शरद पवार गटाचे विजय भांबरे यांनी हा मोर्चा काढला होता. यावेळी शेतकऱ्यांचा त्यामध्ये सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. 

बातमी राज्यातील पावसाची!

राज्यात शुक्रवारीपासून काही भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाला पोषक स्थिती तयार होत असल्याचं हवामान विभागाने जाहीर केलं आहे. आज मराठवाडा मध्य महाराष्ट्र, कोकण गोव्यात उन्हाचा चटका काहीसा वाढला होता. तर मागील चोवीस तासात जळगाव येथे १४.५ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली. मंगळवारी आणि बुधवारी अरुणाचलप्रदेशच्या काही भागात तर हिमालय आणि पश्चिम बंगाल, सिक्कीम आसाम, मेघालय, नागालँड, मिझोराम, मणिपूर आणि त्रिपुरा हलक्या पावसाची शक्यता आहे. तर शुक्रवारपासून विदर्भ आणि मराठवाड्यात हलक्या पावसाच्या सरीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यात दुपारी उन्हाचा चटका काहीसा वाढू लागला आहे. सकाळचा गारठाही कमी झाला आहे.  

बातमी मासेमारांच्या जलसमाधी आंदोलनाची!

जायकवाडी धरणावरील प्रस्तावित सौरऊर्जा प्रकल्पाला छत्रपती संभाजीनगर आणि अहमदनगर येथील मासेमारेकऱ्यांनी आक्रमक विरोध करत जलसमाधी आंदोलन केलं. पोलिस आंदोलन दडपतील याचा अंदाज येताच आंदोलकांनी सकाळीच जायकवाडी धरण गाठलं. जोवर प्रकल्प रद्द होत नाही तोवर आंदोलन मागे घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला. त्यामुळं पोलिसांची धांदल उडाली. जायकवाडी धरणावर १५ हजार एकरातील तरंगता सौर प्रकल्प प्रस्तावित आहे. केंद्रीय मंत्री भागवत कराड यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट समजला जातो. या पप्रकल्पामुळे धरणात मासेमारी करणाऱ्या २ लाख लोकांवर उपासमारीची वेळ येईल, असं आंदोलकांचं मत आहे. या प्रकल्पाच्या सर्वेचं काम् जीओ सर्व्हिसेस मॅरीटाइम प्रा. लि या कंपनीला देण्यात आलं आहे. प्रकल्प रद्द करण्याचा आदेश सरकार काढत नाही तोवर आंदोलन सुरूच राहील, असा इशारा आंदोलकांनी दिलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ajit Pawar & Anjali Krishna : अजित पवारांनी मुरूम उपशासाठी पोलिस उपअधीक्षकांना धमकावलं; शेतकरी नेत्यांचा आरोप

Fruit Farming : फलोत्पादनात अकोला घेतोय आघाडी

Agriculture Technology: अन्नप्रक्रियेतील आधुनिक तंत्रज्ञान ‘पल्स इलेक्ट्रिक फील्ड’

Farm Road : शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना आता सीमांकनासह विशिष्ट क्रमांक

Fertilizer Overpricing : खतांची चढ्या दराने विक्री भोवली

SCROLL FOR NEXT