Solar Power Project agrowon
ॲग्रो विशेष

Buldana Solar Project : बुलडाणा जिल्ह्यातील दुसरा सौर प्रकल्प कार्यान्वित ; बोरी सौर प्रकल्पामुळे ८३० शेतकऱ्यांना मिळणार दिवसा वीज

Solar Power Project : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०’ अंतर्गत जिल्ह्यात ७ मेगावॉट क्षमता असलेला मेहकर तालुक्यातील बोरी सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

Team Agrowon

Buldana News : बुलडाणा : ‘मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.०’ अंतर्गत जिल्ह्यात ७ मेगावॉट क्षमता असलेला मेहकर तालुक्यातील बोरी सौर प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ३३ के.व्ही. उखळी उपकेंद्राअंतर्गत ८३० शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठ्याची सोय झाली आहे.

तथापि पळशी बुद्रुक येथील ५ मेगावॉट सौर प्रकल्प सुरू झाल्यामुळे त्या प्रकल्पातून परिसरातील ७०० शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळत असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिले आहे.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा, अखंडित व भरवशाचा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात राबविण्यात येत असलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० अंतर्गत जिल्ह्यात ६७ विकेंद्रीत सौर प्रकल्पांतून ५२ उपकेंद्रासाठी १९६ मेगावॉट वीज निर्मित करण्यात येणार आहे.

त्यातील पळशी बुद्रुक आणि बोरी असे दोन प्रकल्प सुरू झाले आहे. त्यामुळे या दोन प्रकल्पांतून १ हजार ५३० शेतकऱ्यांना त्यांच्या सोयीनुसार आणि दिवसा वीज द्यायला सुरूवात झाली आहे.

मेहकर तालुक्यातील बोरी हा सौर प्रकल्प ७ मेगावॉट क्षमतेचा असून ३५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आला आहे. तसेच २५ एकर शासकीय जमिनीवर उभारण्यात आलेला बुलडाणा तालुक्यातील पळशी बुद्रुक येथील प्रकल्प ५ मेगावॉट क्षमतेचा असल्याची माहिती महावितरण प्रशासनाने दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT