Buldhana Rain Delay Agrowon
ॲग्रो विशेष

Buldhana Rain Delay: बुलडाणा जिल्हा पावसाच्या प्रतीक्षेत

Kharif Delay: जून महिना मध्यावर आला असताना जिल्ह्यात खरीप पेरणीस अपेक्षित वेग मिळालेला नाही. यंदा एकूण ७.३६ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन असून, आजअखेर केवळ ७६ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

Team Agrowon

Buldhana News: जून महिना मध्यावर आला असताना जिल्ह्यात खरीप पेरणीस अपेक्षित वेग मिळालेला नाही. यंदा एकूण ७.३६ लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे नियोजन असून, आजअखेर केवळ ७६ हजार ६२५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली. ही पेरणी एकूण नियोजित क्षेत्राच्या केवळ १० टक्के एवढीच आहे.

मे महिन्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व आणि समाधानकारक पावसामुळे जूनच्या प्रारंभीच पेरणी सुरू होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मॉन्सूनची वाटचाल जूनच्या सुरुवातीला थांबली. परिणामी बऱ्याच शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व मशागतीला वेग दिला. नंतर पाऊस होताच काही शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली.

आता पावसात खंड पडल्याने विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवर असलेल्या विविध गावांमध्ये मका, सोयाबीनचे पीक धोक्यात आले आहे. शेतकरी दिवसरात्र एक करीत पीक वाचवण्यासाठी तुषार सिंचनाकडे वळाले आहेत. जिल्ह्यात अद्यापही अनेक भागांत समाधानकारक पाऊस झालेला नसल्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी अजूनही पेरणीस सुरुवात केलेली नाही. अनेक ठिकाणी आर्द्रता कमी असल्यामुळे बियाणे वाया जाण्याची भीती आहे.त्यामुळे चांगल्या पावसाची वाट पाहत पेरणी थांबवली आहे. पुढील आठवड्यात मॉन्सून सक्रिय झाल्यास खरीप हंगामाला गती येण्याची शक्यता आहे.

मात्र, तोपर्यंत जिल्ह्यातील पेरणी प्रक्रियेचा वेग संथच राहण्याची चिन्हे आहेत. पेरण्या लांबल्यास मूग, उडीद, ज्वारी या पिकांच्या लागवडीवर परिणाम होत असतो. यंदा ती शक्यता वाढू लागली आहे. अर्धा जून लोटला तरी सार्वत्रिक पेरण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. गेल्या काही वर्षातील अनुभव लक्षात घेता पेरणी ही जून शेवटी किंवा जुलैमध्येच अधिक प्रमाणात होत आलेली आहे. यंदाही याच मार्गाने पेरण्यांचे चक्र फिरू लागल्याचे दिसून येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: मक्याचा बाजार स्थिर; कापूस दर स्थिर, टोमॅटोमध्ये काहीसे चढ उतार, तर डाळिंब व केळीला चांगली मागणी कायम

Mhaisal Lift Irrigation : ‘म्हैसाळ’साठी सौरऊर्जा प्रकल्पाचा नव्या वर्षात प्रारंभ

Wildlife Crop Damage : शाहूवाडीत वन्यप्राण्यांचा धुमाकूळ, शेतीचे नुकसान

Agriculture Electricity : कृषिपंपांच्या वीज संयोजनासाठी प्रतीक्षा कायम

Monsoon Rain Update : राज्यात पावसाचा जोर वाढणार; पुढील पाच दिवसांचा अंदाज जाहीर

SCROLL FOR NEXT