Strawberry Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Strawberry Cultivation : बुलडाण्याची स्ट्रॉबेरी उत्कृष्ट आणि चवदारही

Strawberry Crop : नावीन्यपूर्ण पीक लागवड; शेतकऱ्यांकडून स्वतः पॅकिंग, मार्केटिंग

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
Buldana News : बुलडाणा ः जिल्ह्यात शेतकरी नवनवीन पिकांची वाट धरत असून, यंदा प्रथम जिल्ह्यात १२ एकरांपेक्षा स्ट्रॉबेरीची लागवड झाली असून, दर्जेदार फळे मिळाली आहेत. यामुळे हे पीक या मातीतही येऊ शकते, असा विश्‍वास यानिमित्ताने तयार झाला आहे. मेहकर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ही लागवड केली आहे.


स्ट्रॉबेरीची लागवड ही प्रामुख्याने महाबळेश्‍वर भागात केली जाते. आता बुलडाणासारख्या जिल्ह्यातील शेतकरीसुद्धा या पिकाचा प्रयोग करण्याकडे वळू लागले. या वर्षात ऑक्टोबर महिन्यात मेहकर तालुक्यातील बेलगाव, उमरा या गावांमध्ये सुमारे १२ एकरांपेक्षा अधिक क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची लागवड झाली आहे. सध्या या क्षेत्रातून फळे मिळू लागली असून, शेतकरी स्वतः पॅकिंग करून मार्केटिंगही करीत आहेत. काही माल हैदराबाद, केरळ, कन्याकुमारी, मुंबई अशा बाजारपेठांमध्येसुद्धा पाठवल्या जात आहे.

स्ट्रॉबेरीची फळे ही दिसायला लालबुंद असून आरोग्यासाठीही फायदेशीर मानली जाते. यात प्रामुख्याने ‘क’ जीवनसत्त्व भरपूर मिळते. शिवाय पोटॅशिअम, मॅग्नेशिअम असल्यामुळे हाडांसाठी फायदेशीर आहेत. बेलगाव येथील शेतकरी सुरेशराव भाऊराव वानखेडे यांनी एक दोन नव्हे तर तब्बल आठ एकरांत लागवड केली आहे. या शेतात पिकवलेली स्ट्रॉबेरी त्यांनी मेहकर येथे झालेल्या जिल्हा कृषी महोत्सवात विक्रीसाठी उपलब्ध करून दिली.



या ठिकाणी हजारो शेतकऱ्यांनी, कृषी खात्याच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांचे कौतुक केले. ग्राहकांनीही मोठ्या प्रमाणात या स्ट्रॉबेरीला पसंती देत खरेदी केली. बेलगाव, उमरा व बरटाळा या तीन गावांतील सहा शेतकऱ्यांनी ही लागवड केली आहे. ही फळे अत्यंत चविष्ट, लालबुंद असून, इतर भागाच्या तोडीसतोड तयार झाली आहेत. यातून शेतकऱ्यांना एका नव्या पीकपद्धतीबद्दल आत्मविश्‍वास मिळाला आहे.

गेल्या वर्षी वर्धा जिल्ह्यात स्ट्रॉबेरी लागवडीचा प्रयोग यशस्वी करण्यात आला होता. त्या ठिकाणी भेट देऊन पाहणी केल्यानंतर प्रेरणा मिळाली. यानंतर यंदाच्या हंगामात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात ८ एकरांवर लागवड केली होती. एकरी २२ हजार रोपांची पेरणी केली असून, पहिल्याच प्रयत्नात हे पीक आपल्या भागात चांगल्या पद्धतीने येऊ शकते, याचा विश्‍वास मिळाला.
- सुरेशराव वानखेडे, स्ट्रॉबेरी उत्पादक बेलगाव, ता. मेहकर, जि. बुलडाणा


मेहकरमध्ये यंदा स्ट्रॉबेरीसारख्या पिकाची लागवड झाली. त्या शेतातून चांगल्या पद्धतीची फळे मिळत असून, कृषी विभाग अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना सातत्याने मार्गदर्शन करीत आहे.
- मनोजकुमार ढगे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

SCROLL FOR NEXT