Seed Hub Agrowon
ॲग्रो विशेष

Seed Hub : बुलडाणा जिल्हा ‘सीड हब’ म्हणून नावारूपास यावा

Dr. Kiran Patil : बुलडाणा जिल्हा हा देशात ‘सीड हब’ म्हणून नावारूपास यावा. यासाठी भाजीपाला बीजोत्पादन कंपनी व शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गटांनी एकत्रित येत बीजोत्पादनात काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

Team Agrowon

Buldhana News : जिल्हा हा देशात ‘सीड हब’ म्हणून नावारूपास यावा. यासाठी भाजीपाला बीजोत्पादन कंपनी व शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गटांनी एकत्रित येत बीजोत्पादनात काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.

येथे जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्ह्यात भाजीपाला बिजोत्पादन वाढवणे व बिजोत्पादन करताना येणाऱ्या अडचणी व उपाययोजना संदर्भात झालेल्या आढावा बैठकीत ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. जिल्हा सीड हब बनवण्याच्या अनुषंगाने कार्यवाहीसाठी व क्षेत्र विस्तार करण्यासाठी यावेळी आढावा घेण्यात आला.

सभेला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांच्यासह अधिकारी, जिल्ह्यातील सर्व भाजीपाला बिजोत्पादन कंपनी प्रतिनिधी व शेतकरी उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्ह्यामध्ये भाजीपाला बिजोत्पादन कंपनीमार्फत मेथी, टोमॅटो, टरबूज, खरबूज, कांदा, सिमला मिरची, मिरची आदी भाजीपाल्याचे देऊळगावराजा, सिंदखेडराजा व लोणार व चिखली तालुक्यांमध्ये बिजोत्पादन घेण्यात येते. भाजीपाला बिजोत्पादन कंपन्यांना येणाऱ्या अडचणीबाबत आढावा घेत डॉ. पाटील यांनी उपाय योजना सुचवल्या.

भाजीपाला बिजोत्पादन केवळ देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार व चिखली तालुक्यांमध्येच न घेता संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यामध्ये व बाकीच्या जिल्ह्यामध्ये भाजीपाला बिजोत्पादन क्षेत्र विस्तार करावे, असे सूचवले. तसेच बुलडाणा जिल्ह्यामध्ये भाजीपाला बिजोत्पादन केंद्र (Seed Hub) उभारण्याकरिता भाजीपाला बिजोत्पादन कंपनी व शेतकरी उत्पादक कंपनी /शेतकरी उत्पादक गट यांनी एकत्रित समन्वय साधून जास्तीत भाजीपाला बिजोत्पादन क्षेत्राचा विस्तार करण्याचीही सूचना केली.

भाजीपाला बिजोत्पादनासाठी कंपन्यांना सिंचनाची सोय आवश्यक असल्यास मागेल त्याला शेततळे योजनेंतर्गत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा लाभ घ्यावा. तसेच मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेंतर्गत पंपासाठी ९५ टक्के अनुदान असून सदर याजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ घ्यावा, असे सांगितले.

शेतकरी उत्पादक कंपनी /शेतकरी उत्पादक गटांनी समूह पद्धतीने शेतजमिनीमध्ये भाजीपाला बिजोत्पादन करण्याबाबत करार करून घेतल्यास भाजीपाला बिजोत्पादन कंपनी व शेतकरी उत्पादक कंपनी /शेतकरी उत्पादक गट या दोघांनाही फायदा होईल.

भाजीपाला बिजोत्पादन कंपनींतर्गत काम करणाऱे कर्मचारी, मजूर व त्यांच्या कुटुंबीयास आयुष्यमान भारत योजना, पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, ई-श्रम योजना, पंतप्रधान जन आरोग्य योजना, पंतप्रधान जीवन ज्योती विमा योजना या योजनेचा लाभ घेण्याबाबत प्रोत्साहीत करावे, असेही ते म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT