Budget : २०२५-२६ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. अर्थमंत्री दुपारी आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशनाची शुक्रवारी (ता.३१) राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने सुरुवात होणार आहे. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण पाहणी अहवाल सादर करतील. शनिवारी (ता. १ फेब्रुवारी) केंद्रीय अर्थसंकल्प लोकसभेत सादर केला जाणार आहे. यामध्ये शेतीविषयक धोरणे, सामान्य, गोरगरिबांना दिलासा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.
१८ व्या लोकसभेचे पहिले अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी ११ वाजता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संसद, लोकसभा आणि राज्यसभेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार आहेत. यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर करणार आहेत. अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 1 फेब्रुवारीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन १८व्या लोकसभेचा पहिला आणि मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
सलग ८ वा अर्थसंकल्प निर्मला सितारामन मांडणार आहेत. ३ फेब्रुवारी ते ६ फेब्रुवारीदरम्यान लोकसभा आणि राज्यसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा होईल. यानंतर पंतप्रधान मोदी ६ फेब्रुवारीलाच राज्यसभेत चर्चेला उत्तर देण्याची शक्यता आहे.
गरीब, मध्यमवर्गीयांसाठी अर्थसंकल्प : नरेंद्र मोदी
देशाच्या जनतेनं तिसऱ्यांदा नेतृत्त्वाची संधी दिली. गरीब, मध्यमवर्गीय परिवारामध्ये महालक्ष्मीची कृपा असावी. स्वातंत्र्याच्या १०० वर्षात भारत विकसित होणार आहे. भारत सध्या मिशनमेडमध्ये आहे. २०४७ पर्यंत भारत विकसीत होणार असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे अधिवेशन लांबणार
दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसाची सुट्टी वगळता अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्याचे कामकाज १३ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी अभिभाषणानंतरच्या अभार प्रस्तावावर चर्चा करतील. त्यानंतर पहिला टप्पा संपुष्टात येईल. दुसरा टप्पा १० मार्चपासून सुरू होईल. या अधिवेशनाची सांगता ४ एप्रिल रोजी होणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.