Budget 2025 : पीक विमा, लाडकी बहीण योजनेसाठी अर्थसंकल्पात विशेष तरतूद करा; खासदार शिंदेची मागणी

Maharashtra Politics : महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या पीक विमा आणि लाडकी बहीण योजनेला यंदाच्या बजेटमध्ये अतिरिक्त तरतूद करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्याकडे केली.
Maharashtra Politics
Maharashtra Politicsagrowon
Published on
Updated on

MP Shrikant Shinde Budget 2025 : केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन १ फेब्रुवारी रोजी २०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात, लोककल्याणकारी योजनांसाठी अतिरिक्त निधी देण्याची शक्यता आहे. याबाबत महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या पीक विमा आणि लाडकी बहीण योजनेला यंदाच्या बजेटमध्ये अतिरिक्त तरतूद करण्याची मागणी खासदार श्रीकांत शिंदे यांनी अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्याकडे गुरूवार (ता.३०) केली.

खासदार शिंदे म्हणाले की, "केंद्रीय अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी पुरेसे आर्थिक सहाय्य महाराष्ट्राला देण्याची गरज आहे. शेतीच्या कामासाठी बनवल्या जाणाऱ्या यंत्रांमध्येही नव तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. यामध्ये ड्रोन फवारणी, हवामान निर्देशक उपकरणे इत्यादींच्या संसाधनांसाठी यंदाच्या बजेटमध्ये महाराष्ट्राला भरीव निधी द्यावा". अशी मागणी खासदार शिंदे यांनी केली आहे.

Maharashtra Politics
Maharashtra Politics: कुणीच अन् कधीच संपत नसतं

"सशक्त भारतासाठी महाराष्ट्राला बळकट करणे महत्वाचे आहे. यासाठी राज्यातील महायुती सरकार केंद्रातील भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार एकत्र काम करत आहे. भारताच्या दरडोई उत्पन्नात सर्वाधिक उत्पन्न महाराष्ट्र देत आहे. यामुळे महाराष्ट्राला बळकट करण्यासाठी यंदाचा अर्थ संकल्प महत्वाचा आहे." असे खासदार शिंदे यांनी सांगितले.

कल्याणकारी योजनांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पाकडून अपेक्षा

खासदार शिंदे म्हणाले की, "महाराष्ट्रात सध्या लाडकी बहिण योजना, नमो किसान योजना, पीक विमा यासारख्या योजनेतून चालना मिळत आहे. या योजनांना यंदाच्या बजेटमध्ये कायमस्वरूपी आर्थिक तरतूद व्हावी अशी आमची मागणी आहे".

एआय तंत्रज्ञानासाठी आर्थिक मदत आवश्यक

"राज्याच्या क्षमतेचा जास्तीत जास्त वापर करण्यासाठी, केंद्र सरकारला पायाभूत सुविधा, रोजगार निर्मिती आणि आर्टिफिशियल इंटेलिजेंस सारख्या उदयोन्मुख तंत्रज्ञानासाठी पुरेसे आर्थिक सहाय्य देण्याची विनंती केली आहे. याचबरोबर राज्यातील लहरी हवामानाची परिपूर्ण माहिती मिळण्यासाठी नवीन तंत्रज्ञानासाठी बजेटमध्ये विशेष निधी द्यावा". अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com