Sugar Production Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Production : ब्राझील ने ओलांडला चारशे लाख टन साखर उत्पादनाचा टप्पा अजूनही हंगाम सुरूच

Sugar Market : ब्राझीलने यंदाच्या हंगामात साखर उत्पादनाचा ४०० लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे. या देशाच्या साखर उत्पादनात हंगामाच्या शेवटीही वाढ कायम आहे.

राजकुमार चौगुले: ॲग्रोवन वृत्तसेवा

Kolhapur News : ब्राझीलने यंदाच्या हंगामात साखर उत्पादनाचा ४०० लाख टनांचा टप्पा ओलांडला आहे. या देशाच्या साखर उत्पादनात हंगामाच्या शेवटीही वाढ कायम आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत साखर उत्पादनात ३५ टक्के वाढ झाली आहे. गेल्या पाच वर्षांत ब्राझीलमध्ये यंदा सर्वाधिक साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे.

ब्राझीलच्या एकूण साखर उत्पादनात दक्षिण मध्य भागाचा मोठा वाटा आहे. यंदा या भागात नोव्हेंबरअखेर हंगाम सुरू राहिला. सध्या ऊस उत्पादक भागात असणारे कोरडे हवामान ऊस तोडीसाठी पूरक ठरले.

जागतिक पातळीवर साखरेला चांगले दर मिळत असल्याने अनेक कारखान्यांनी उसाची जास्तीत जास्त तोड करण्याला प्राधान्य दिले, त्यामुळे साखरेच्या उत्पादनातही चांगलीच वाढ झाली.

यंदा ४१० लाख टन साखर तयार होण्याची शक्यता आहे. यंदा निर्यात ३२० लाख टन होईल, असा अंदाज आहे. नोव्हेंबरअखेर ब्राझीलने २७५ लाख तर साखर निर्यात केली आहे. यंदा साखर उत्पादन वाढल्याने ब्राझीलच्या मुख्य बंदरांना वाहतुकीच्या अडचणी येत आहेत. जहाजांची संख्या आणि दीर्घ प्रतीक्षा वेळ यामुळे लॉजिस्टिक अडथळे निर्माण झाले आहेत.

यामुळे उत्पादित होणारी साखर जलद गतीने निर्यात होताना मोठे अडथळे येत असल्याचे चित्र आहे. इतर शेतीमालाच्या तुलनेत साखरेसाठी जहाजे मिळवणे निर्यातदारांना अडचणीचे ठरत आहे.

यामुळे बहुतांश साखर बंदरांवर अनेक दिवस पडून राहत असल्याचे ब्राझीलमधील अनेक मुख्य बंदरांमधील चित्र आहे. यंदा अन्य देशांत साखरेला चांगली मागणी असल्याने मागणीचे प्रमाणही वाढले आहे. यामुळे मागणी असूनही प्रत्यक्षात साखरेचा वेळेत पुरवठा करण्यासाठी निर्यातदारांना कसरत करावी लागत आहे.

ब्राझीलचा हंगाम एप्रिलला सुरू झाला. पहिल्या महिन्यापासूनच साखर उत्पादनात वाढ होत गेली. ती हंगाम संपेपर्यंत कायम आहे. गेल्या पाच वर्षांत यंदा ब्राझीलचे हवामान चांगले आहे. तोडणीमध्येही जादा पावसाचा अडथळा न झाल्याने कारखाने अजूनही सुरू आहेत. अनेक कारखान्यांनी जादा गाळप क्षमतेने कारखाने चालवले.

साधारणत: नोव्हेंबरमध्ये हंगाम संपतो. यंदा डिसेंबरमध्येही कारखाने सुरू होते. डिसेंबरमध्ये येथील कारखान्यांनी २ लाख ३६ हजार टन साखर उत्पादन केले. गेल्या वर्षी १ लाख ७४ हजार टन साखर तयार केली.

गेल्या पाच वर्षांत डिसेंबरमध्ये एवढे साखर उत्पादन होण्याचा ही पहिलीच वेळ असल्याचे ‘युनिका’ या संस्थेने आपल्या ताजा अहवालात म्हटले आहे. डिसेंबरअखेर देशात ८१ कारखाने सुरू आहेत. जानेवारीच्या पहिल्या पूर्वार्धापर्यंत हे कारखाने सुरू राहतील, अशी शक्यता ‘युनिका’ने व्यक्त केली आहे.

बाजारपेठेवर वर्चस्व राहणार

जागतिक बाजारपेठेवर यांचा ब्राझीलचेच वर्चस्व राहणार हे स्पष्ट झाले आहे. भारतासह अन्य साखर उत्पादक देश नैसर्गिक परिस्थितीअभावी यंदा पिछाडीवर पडत आहेत. याउलट यंदा ब्राझीलमध्ये ऊस उत्पादन वाढण्यासाठी चांगले हवामान सातत्याने असल्याने साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यामुळे सध्या जागतिक बाजारपेठेत ब्राझीलच्या साखरेचा बोलबाला आहे.

ब्राझीलमधील गेल्या पाच वर्षांतील साखर उत्पादन

वर्ष साखर उत्पादन (लाख टनांत)

२०२० ३८८

२०२१ ३३१

२०२२ ३३२

२०२३ ४०८ (१५ नोव्हेंबर २०२३ पर्यंत)

(स्रोत : यूएसडीए)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विदर्भात महायुतीला स्पष्ट कौल, तर महाविकास आघाडीला नाकारले

Jharkhand Assembly Election Result : झारखंडमध्ये पुन्हा हेमंत सोरेन सरकार

Maharashtra Assembly Election Result 2024 : वऱ्हाडामध्येही महायुतीचा बोलबाला

Maharashtra Election Result : ‘लाडक्या बहिणीं’चा आशीर्वाद महायुतीला!

Maharashtra Assembly Election Result 2024 : छत्रपती संभाजीनगर, बीड, जालन्यात महायुतीच सरस

SCROLL FOR NEXT