Boycott on Voting  Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election Boycott : बाळगंगा धरणग्रस्‍तांचा मतदानावर बहिष्‍कार!

Boycott on Voting : पेण तालुक्यात बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी रायगड लोकसभा मतदार संघातील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.

Team Agrowon

Raigad News : राज्यासह संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून, निवडणूक आयोगाकडून शंभर टक्के मतदानासाठी जनजागृतीवर भर दिला जात आहे.

पेण तालुक्यात बाळगंगा प्रकल्पग्रस्तांनी रायगड लोकसभा मतदार संघातील मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याने प्रशासनाची झोप उडाली आहे.

बाळगंगा धरणाचे काम २०१० पासून सुरू असून ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पाला १३ वर्षे पूर्ण होत आली तरी काम पूर्ण झालेले नाही.

त्यामुळे जावळी, वरसई, करोटी, निधवली, गागोदे आणि वाशिवली या सहा ग्रामपंचायतीतील ९ महसुली गावे आणि १३ आदिवासी वाड्यांकडे सरकारचे दुर्लक्ष झाले असून प्रकल्पामुळे तीन हजारांहून अधिक कुटुंबे विस्थापित झाले आहेत.

प्रकल्प पूर्ण व्हावा, विस्थापितांचे प्रश्‍न मार्गी लागावेत यासाठी प्रकल्पग्रस्तांनी अनेकदा आंदोलने केली, मात्र सरकारचे दुर्लक्ष होत असल्‍याने सहा ग्रामपंचायतींनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT