Corona Booster Dose Agrowon
ॲग्रो विशेष

Corona Booster Dose : आरोग्य केंद्रातून बूस्टर डोस गायब

खालापूर तालुक्यातही आरोग्य केंद्रातून बूस्टर डोस गायब झाले आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट पुन्‍हा समोर आले आहे.

Team Agrowon

Khalapur News : काही दिवसांपासून राज्यात कोरोना संसर्गाने (Corona Virus) पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. यात मात्र कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यात महत्त्वाचा वाटा असलेले लसीकरण पूर्णपणे थंडावले आहे.

खालापूर तालुक्यातही आरोग्य केंद्रातून (Health Center) बूस्टर डोस गायब झाले आहे. त्यामुळे कोरोनाचे संकट पुन्‍हा समोर आले आहे.

कोरोना संसर्गाची चौथी लाट सध्या सुरू झाली आहे. रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी रुग्ण सापडले असले, तरी खालापूर तालुका मात्र अद्याप चौथ्या लाटेपासून दूर आहे.

कोरोना रुग्ण संसर्गाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रायगड जिल्ह्यात तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी खालापूर तालुका होता.

तर तिसऱ्या लाटेत डेल्टा प्लसचा रुग्णही खालापूर तालुक्यात सापडला होता. कोरोना संसर्गात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णांना उपचारासाठी बेड, ऑक्सिजन रुग्णवाहिका मिळवतानाही प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

तालुक्यात कोरोना रुग्णसंख्या १२ हजार २९४ च्या घरात गेली होती. त्यापैकी २६१ जणांचा मृत्यू झाला. तर १२ हजार ३३ रुग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले होते. कोरोना लस आल्यानंतर संसर्गाला आळा बसला.

तालुक्यातही लसीकरणाला प्रतिसाद मिळाला; मात्र बूस्टर डोस मर्यादित जणांनी घेतला आहे. आता कोरोना संसर्ग पुन्हा वेगाने पसरत आहे. मात्र, आरोग्य केंद्रात बूस्टर डोसच उपलब्ध नाहीत.

बूस्टर डोस घेतलेल्यांची खालापूरमधील संख्या

(आरोग्य केंद्र व उपकेंद्र)

खालापूर - १६४४

कांढरोली - ४

होनाड- ४

बीड - ६०

माणकिवली - ५३

उंबरे - २१

लोहप - २२३४

मोहपाडा - १७

वासांबे - १५२

रिस - ८४

वावोशी- १२३२

उसरोली - ७

वडवळ - १४

चौक - ९९

हातनोली- ०

कलोते - ७१

तालुक्यात कोरोना रुग्ण सापडलेला नाही; परंतु सर्वांनी काळजी घेणे आवश्यक आहे. बूस्टर डोस सध्या उपलब्ध नाहीत. डोस उपलब्ध झाल्यानंतर त्याबाबत माहिती देण्यात येईल.
डॉ. प्रसाद रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी, खालापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT