Nandurbar Corona News : कोरोनामुक्त गाव स्पर्धेत नंदुरबारमधील नानगीपाडा चमकले

गावात संशयित रुग्ण आढळल्यास त्याला खासगी वाहनाची व्यवस्था करून खासगी किंवा सरकारी दवाखान्यात दाखल करण्याची सोय करण्यात आली.
Nandurbar Corona News
Nandurbar Corona NewsAgrowon
Published on
Updated on

Nandurbar News : कोविड-१९ चे व्यवस्थापन करून कोरोनामुक्त गाव (Corona Free Village) स्पर्धेत ग्रामपंचायत नानगीपाडा (ता. नवापूर) यांनी नंदुरबार जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून त्यांची विभागस्तरावर निवड झाली.

राज्य शासनाने पुरस्कृत केलेल्या कोविड-१९ व्यवस्थापन केलेली कोरोनामुक्त गाव स्पर्धा झाली. स्पर्धेत प्रथम टप्प्यात ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक तालुक्यातून दहा पंचायतीचे प्रस्ताव मागविण्यात आले.

Nandurbar Corona News
Corona And Politics : राजकारणाच्या तावडीत ‘कोरोना’

त्यातून जिल्हास्तरावर जिल्हा परिषदेकडून समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी सर्वोच्च गुण प्राप्त असलेल्या नवापूर तालुक्यातील ग्रामपंचायत नानगीपाडा तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवून जिल्ह्यातही प्रथम क्रमांक राखत स्थान निश्चित ठेवले.

दुसऱ्या क्रमांकावर शहादा तालुक्यातील प्रकाशा ग्रामपंचायत, तर तिसऱ्या क्रमांकावर तळोदा तालुक्यातील इच्छागव्हाण या पंचायतींची नावे जाहीर केली.

गावात संशयित रुग्ण आढळल्यास त्याला खासगी वाहनाची व्यवस्था करून खासगी किंवा सरकारी दवाखान्यात दाखल करण्याची सोय करण्यात आली. संशयित रुग्णाला व त्याच्या कुटुंबीयांना घरपोच किराणा भाजीपाला पुरविण्याची सोय करण्यात आली.

कोविड-१९ व्यवस्थापन करून गावाला कोरोनामुक्त जास्त कसे करता येईल याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी मार्गदर्शन केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com