Cotton Pest Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Bollworm : कापसावर बोंड अळीचे संकट

Cotton Pest : ओलाव्याच्या परिणामी कापूस आणि सोयाबीनला भाव नसताना आता कॉटनसिटी, अशी ओळख असलेल्या यवतमाळच्या काही भागात बोंड अळीने डोके वर काढले आहे.

Team Agrowon

Yavatmal News : ओलाव्याच्या परिणामी कापूस आणि सोयाबीनला भाव नसताना आता कॉटनसिटी, अशी ओळख असलेल्या यवतमाळच्या काही भागात बोंड अळीने डोके वर काढले आहे. महागाव तालुक्‍यातील फुलसावंगी, चिल्ली (ई) परिसरात बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात खरीप लागवड क्षेत्र सुमारे ९ लाख हेक्‍टर आहे. त्यातील पावणे पाच ते पाच लाख हेक्‍टर इतक्‍या मोठ्या क्षेत्रावर कपाशीची लागवड होते. त्यामुळेच या जिल्ह्याला कॉटनसिटी अशी देखील ओळख आहे. कापूस हे या भागातील मुख्य पीक असले तरी ते पावसाच्या पाण्यावरच घेतले जात असल्याने निसर्गाच्या अनिश्‍चिपणाचा फटका सातत्याने या भागातील शेतकऱ्यांना बसतो.

कधी ऐन वेचणीच्यावेळी पाऊस झाल्यास कापसाची प्रत खालावते त्यासोबतच आर्द्रता वाढल्याने बाजारात दरही मिळत नाही. उत्पादकतेवर देखील त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यातूनच खर्च आणि उत्पन्नाचा ताळेबंद जुळत नसल्याने अखेरीस शेतकऱ्यांमध्ये नैराश्‍य वाढीस लागते, असा दरवर्षीचा अनुभव आहे.

यावर्षी देखील ऐन वेचणीच्या कालावधीत मॉन्सूनोत्तर पाऊस बरसला. त्यातून बोंडातील कापूस भिजल्याने ओलावा वाढला आहे. बाजारात केवळ ८ ते १२ टक्‍के या प्रमाणात ओलावा असलेल्या कापसाची खरेदी होते. त्यामुळे आधीच शेतकरी चिंतेत असताना बोंड अळीच्या प्रादुर्भावाने त्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. फुलसावंगी, चिली (ई) या भागात पिकातील काही बोंड ही प्रादुर्भावग्रस्त दिसून आली आहेत.

कृषी विभाग अनभिज्ञ

बोंड अळीच्या प्रादुर्भावाबाबत काही उपाययोजनांची शिफारस करण्यात आली किंवा काय, याबाबत कृषी विभागाकडे यांना विचारणा केली असता याबाबत अद्याप रिपोर्टिंगच झाले नसल्याचा धक्‍कादायक खुलासा खात्याकडून करण्यात आला. क्रॉपसॅपच्या माध्यमातून निरीक्षण नोंदविले जात असल्याचे सांगण्यात आले. परंतु संबंधित यंत्रणेच्या निरीक्षणातून ही बाब समोर आली नाही, अशी माहिती कृषी खात्याच्या सूत्रांनी दिली.

बोंड अळीचा प्रादुर्भाव सुमारे पाच एकरावर झाला आहे. त्यामुळे आता पिकातून काहीच हाती लागणार नाही याची कल्पना आल्याने नाईलाजाने हे पीक काढून टाकावे लागत आहे. उत्पन्न तर काही झाले नाही उलट वर्षभर व्यवस्थापन करून जपलेले पीक काढून टाकण्यावर आता अतिरिक्‍त खर्च होणार आहे.
- गेमासिंग राठोड, शेतकरी, चिली, महागाव, यवतमाळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

Cotton Market Price: कापूस दबावातच; तसेच काय आहेत सोयाबीन, कोथिंबीर, हिरवी मिरची आणि खरबुजाचे आजचे बाजारभाव

Crop Damage Survey: आंबा, काजू नुकसानीचे सर्व्हेक्षण सुरू

SCROLL FOR NEXT