Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Seeds : प्रामाणिक बियाणे उत्पादकांना कोणताही त्रास होणार नाही

Team Agrowon

Chhatrapati sambhajai Nagar News : ‘‘शेतकरी हिताचे कायदे करीत असताना प्रामाणिकपणे काम करणाऱ्या बियाणे उत्पादकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, याबाबत शासन दक्षता घेईल,’’ अशी ग्वाही कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी दिली.

छत्रपती संभाजीनगर येथील बजाज भवन येथे श्री. चव्हाण यांच्या हस्ते ‘सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र’च्या (सियाम) नूतन कार्यालयाचे उद्‍घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून ‘महाबीज’चे महाव्यवस्थापक सचिन कलंत्री, कृषी संचालक विकास पाटील यांच्यासह ‘सियाम’चे अध्यक्ष समीर मुळे उपस्थित होते.

श्री. चव्हाण म्हणाले, ‘‘सियाम करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे. बियाणे उत्पादकांनी मांडलेल्या समस्यांबाबत संबंधितांना योग्य कार्यवाही करण्याबाबत सूचना देण्यात येतील आणि त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल.’’

श्री. मुळे यांनी बियाणे उद्योगासमोर असणाऱ्या समस्या व बियाणे उद्योगाचे आजचे प्रश्‍न, महाराष्ट्र शासन तयार करीत असलेले नवीन कायदे आदींची माहिती दिली. श्री. चव्हाण यांच्या हस्ते ‘एशिया अँड पॅसिफिक सीड असोसिएशन’चे अध्यक्ष मनीष पटेल यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. शाळिग्राम वानखडे यांनी सूत्रसंचालन केले. रितेश मिश्रा यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Weather : कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पाऊस शक्य

Retreating Monsoon : महाराष्ट्रातून मॉन्सूनच्या परतीला सुरुवात

Cotton Soybean Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना मिळाले ९६ कोटींचे अर्थसाह्य

Soybean Cotton Subsidy : कापूस, सोयाबीन उत्पादकांना २६५ कोटींवर अर्थसाह्य देय

MSP Procurement : ‘पणन’कडून तेरा ठिकाणी शासकीय खरेदी केंद्रे सुरू होणार

SCROLL FOR NEXT