Bogus Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Bogus Fertilizer : किणीत चार लाखांचे बोगस खत जप्त

किणी (ता. चंदगड) येथील प्रियांका ॲग्रो सर्व्हिसेस या खत विक्री केंद्रामध्ये सुमारे चार लाख रुपये किमतीचे १३.५ टन बोगस खत कोल्हापूरच्या भरारी पथकाने जप्त केले.

Team Agrowon

Kolhapur News : किणी (ता. चंदगड) येथील प्रियांका ॲग्रो सर्व्हिसेस या खत विक्री केंद्रामध्ये सुमारे चार लाख रुपये किमतीचे १३.५ टन बोगस खत कोल्हापूरच्या भरारी पथकाने जप्त केले.

या प्रकरणी गुजरातमधील क्रॉप्स फर्टिलायझर प्रायव्हेट लिमिटेड मेहसाणा, एसएच ॲग्रो इंड्रस्ट्रीज अहमदाबाद या दोन कंपन्यांसह दुकान मालक आल्पी करुदाद लोबो यांच्यावर येथील पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

कृषी विभागाच्या भरारी पथकाचे प्रमुख बंडा कुंभार यांनी या दुकानातून पाण्यातील विद्राव्य खतांचे नमुने विश्‍लेषणासाठी घेतले होते. त्यामध्ये या दोन्ही कंपनीच्या खतामध्ये एनपीकेचे प्रमाण नगण्य असल्याचे आढळले.

शिवाय त्यांनी महाराष्ट्र शासनाचा खत विक्री परवाना न घेता विक्री केल्याचे स्पष्ट झाले. त्यांच्यावर खत नियंत्रण आदेश १९८५ व अत्यावश्यक वस्तू अधिनियम १९५५ मधील तरतुदींचा भंग केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला.

गुणनियंत्रण संचालक विकास पाटील, सहसंचालक बसवराज बिराजदार, अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाने तंत्र अधिकारी बंडा कुंभार, गुणनियंत्रण निरीक्षक प्रवीण जाधव, रामचंद्र शेळके, विभागीय पथकाचे प्रल्हाद साळुंखे, उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील, कृषी अधिकारी यशोदीप पोळ, सतीश कुंभार यांनी ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक संतोष घोळवे तपास करीत आहेत.

खत विक्रेत्यांनी व शेतकऱ्यांनी खत कंपन्यांच्या परवान्याची व त्यातील खतांच्या ग्रेडची खात्री करावी. खरेदीची पक्की पावती घ्यावी. कोणत्याही कृषी निविष्टांची शंका आल्यास त्वरित तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
बसवराज बिराजदार, विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Fertiliser Linking : उत्तर प्रदेशच्या धर्तीवर खत लिकिंगसाठी महाराष्ट्रात नवा नियम आणणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंची विधानसभेत माहिती

Crop Advisory: कृषी सल्ला : कोकण विभाग

Blight Disease: बदलत्या वातावरणात करपा रोगाची शक्यता

Raju Chaudhari Success Story: कडा ते कॅनडा

Nilesh Rane: कोकणातील आंबा, काजू बागायतदारांच्या मदत प्रश्नी निलेश राणेंनी कृषीमंत्र्यांना घेरले

SCROLL FOR NEXT