Urea Fertilizer Agrowon
ॲग्रो विशेष

Urea Black Market : अनुदानित युरियातील काळाबाजार उघडकीस

Urea Fertilizer : शेतकऱ्यांसाठी पाठवण्यात आलेला अनुदानित युरिया काळ्याबाजारात विकला जात असल्याचा संशय खरा निघाला आहे. कोट्यवधी रुपयांचा युरिया काळ्याबाजारात विकणारे रॅकेट कृषी विभागाच्या जाळ्यात सापडले आहे.

Team Agrowon

Pune News : शेतकऱ्यांसाठी पाठवण्यात आलेला अनुदानित युरिया काळ्याबाजारात विकला जात असल्याचा संशय खरा निघाला आहे. कोट्यवधी रुपयांचा युरिया काळ्याबाजारात विकणारे रॅकेट कृषी विभागाच्या जाळ्यात सापडले आहे.

एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की या प्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश कृषी आयुक्तालयाने दिले आहेत. अर्थात, या रॅकेटचा पर्दाफाश कृषी विभागाने केलेला नाही. कृषी आयुक्तांकडे एक लेखी तक्रार प्रकाश पाटील नावाच्या व्यक्तीने पुराव्यांसह केली होती. यातील गैरव्यवहाराची रक्कम ५० कोटींच्या आसपास असल्याचा दावा तक्रारदार श्री. पाटील यांचा होता. युरियाचे रॅकेट कार्यरत असल्याची ही तक्रार दाबून ठेवण्यात आली होती.

त्यामुळे तक्रारदाराने चौकशीसाठी पुन्हा दुसरा अर्ज केला. गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी याची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. पुण्याच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना कृषी आयुक्तालयाने एक आदेश दिला आहे. त्यात इंदापूर भागातील एक व्यक्ती अनुदानित खते थेट औद्योगिक वापरासाठी बेकायदेशीरपणे विकत असल्याचा उल्लेख आहे.

‘‘आयुक्तालयाकडे आलेली तक्रार दाबून ठेवली नव्हती. उलट आम्ही स्वतंत्र पथक स्थापन केले. चौकशी पथकाने आपला अहवाल पुण्याचे विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी यांना दिला होता. श्री. नाईकवाडी यांनीही या प्रकरणाचे धागेदोरे तपासले व पथकाचा अहवाल योग्य असल्याचा निर्वाळा दिला. त्यानंतर लगेच पुढील कारवाईचे आदेश दिले आहेत,’’ असा दावा ‘गुणनियंत्रण’च्या अधिकाऱ्याने केला.

युरिया गैरव्यवहार प्रकरणात ‘केंद्रीय खत नियंत्रण आदेश १९८५’मधील तरतुदींचे उघडपणे उल्लंघन झाल्याचे आयुक्तालयाचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रकरणात मुख्य सूत्रधार असलेल्या खत दुकानदाराचा परवाना रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच फौजदारी गुन्हा दाखल करा. या खत विक्रेत्याचा युरिया पुरवठा रोखण्याच्या सूचना खत उद्योगातील सर्व कंपन्यांना द्या, असे आदेश आयुक्तालयाने दिले आहेत.

...असे चालविले खत विक्रीचे रॅकेट

शेतकऱ्यांना खत विक्रीची पक्की बिले दिली जात नाहीत

खते विकताना बिलावर शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जात नाहीत

शेतकऱ्यांना विकलेले खत व खत दुकानामधील विक्री पावती पुस्तक यात तफावत

शेतकऱ्यांना खत विकल्याचे दाखवून प्रत्यक्षात काळ्याबाजारात विक्री

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing Planning: दारव्हा तालुक्यात ६९ हजार हेक्टरवर खरिपाचे नियोजन

Illegal HTBT Cotton Seeds: वर्ध्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांचा साठा जप्त

El Nino Preparedness Guidance: ‘एल निनो’वर मात करण्यासाठी समन्वयाची गरज : प्रा. डॉ. इंद्र मणी

Agriculture Inputs Shortage: कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून युरिया, डीएपीची कृत्रिम टंचाई

BBF Planter: वेळ, मजुरी आणि खर्चात बचत करणारे बीबीएफ पेरणी यंत्र

SCROLL FOR NEXT