Shaktipeeth Highway agrowon
ॲग्रो विशेष

Shaktipeeth Highway : भाजपमधील खासदारांचाच शक्तिपीठ महामार्गाला विरोध; मुख्यमंत्र्यांनी पर्यायी मार्ग काढावा

Nagpur-Goa Shaktipeeth Mahamarg : मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना भेटून यातून पर्यायी मार्ग काढता येईल का? हे पाहावे लागणार आहे". अशी माहिती भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.

sandeep Shirguppe

Nagpur-Goa Shaktipeeth Highway : नागपूर ते गोवा जाणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील १२ जिल्ह्यातून आता जोरदार विरोध होताना पहायला मिळत आहे. कोल्हापूर, सांगलीनंतर आता नांदेडमधील नेत्यांनीही या महामार्गास विरोध दर्शवला आहे. भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी या महामार्गाबाबत आक्षेप नोंदवला आहे. शेतकऱ्यांच्या हिताचा हा महामार्ग नसल्याने या महामार्गाला शेतकरी विरोध करत आहेत. अशी माहिती चव्हाण यांनी शनिवार (ता.१८) माध्यमांना दिली.

यावेळी खासदार चव्हाण म्हणाले की, "शेतकऱ्यांच्या कुठल्याही हिताचा हा महामार्ग नसल्याने या महामार्गाला विरोध होत आहेत. नांदेडमधून देखील हा महामार्ग जात असून या महामार्गाला नांदेड जिल्ह्यातील शेतकरी विरोध करीत आहेत. शक्तीपीठ महामार्गाला पूर्वीही विरोध होता आणि आता ही माझा विरोध आहे. मुख्यमंत्री आणि शेतकऱ्यांना भेटून यातून पर्यायी मार्ग काढता येईल का? हे पाहावे लागणार आहे". अशी माहिती भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी दिली.

"नांदेडचा बीड होऊ द्यायचा नसेल तर मुंडे बंधू आणि भगिनींना नांदेडचे पालकमंत्री पद देऊ नये अशी भूमिका मराठा समन्वयकाने घेतली आहे. यावर खासदार अशोक चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिलीय. मागण्या अनेक होत असतात, लोकांची मतं असतात, शेवटी हा निर्णय मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्री जे ठरवतील तेच नांदेड जिल्ह्याचा पालकमंत्री होतील" अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

नांदेडमधून शेतकऱ्यांचा जोरदार विरोध

नांदेड जिल्ह्यातील मालेगाव येथे शेतकऱ्यांनी बैठक घेऊन शक्तिपीठ महामार्गाला विरोध केला. प्रचंड घोषणाबाजी करत शासनाचा निषेध या शेतकऱ्यांनी केला आहे. जमिनीपासून ३० ते ४० फूट उंच हा मार्ग होणार आहे. महामार्ग होत असताना जमिनीची नासधूस होऊन जमिनीचा कस कमी होण्याची शक्यता असल्यामुळे, व बागायतदार शेतकऱ्यांच्या जमिनी सुद्धा या प्रकल्पात जात असल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार असल्याचेही शेतकऱ्यांनी खंत व्यक्त केली.

कुठलीही गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग कशासाठी शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून घेण्याचा हा घाट असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे फक्त कोल्हापूरच नव्हे तर राज्यातील बारा जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध होत आहे येत्या २४ जानेवारी रोजी शेतकरी राज्यव्यापी आंदोलन करणार आहेत.

वर्धा ते गोवा असा हा महामार्ग असून या महामार्गामध्ये १२ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी जात आहेत. शक्तीपीठ महामार्ग वर्धा, यवतमाळ, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांमधून जाणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cow Protection Chaos: गोरक्षकांचा धुडगूस शेतकऱ्यांच्या मुळावर

Shirala Nagpanchami: शिराळ्यात २३ वर्षांनंतर पुन्हा झाले जीवंत नागदर्शन

Nandani Math Elephant: नांदणी मठाची ‘महादेवी’ दुरावली

Pandharpur Flood: पंढरपुरात चंद्रभागेला पूरस्थिती, मंदिरे पाण्याखाली

Ladki Bahin Yojana: ‘लाडक्या बहिणीं’ची पडताळणी सुरूच ठेवा: मुख्यमंत्री फडणवीस

SCROLL FOR NEXT