Nanded News : नांदेड जिल्ह्यात सात कलमी कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू

Mission 100 days Programme : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सात कलमी कार्यक्रमाच्या ‘मिशन १०० डे’ अंमलबजावणीसाठी नांदेड जिल्ह्यातील यंत्रणा कार्यान्वित केली आहे.
Nanded Zilha Parishad
Nanded Zilha ParishadAgrowon
Published on
Updated on

Nanded Development Programme : नांदेड : जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या सात कलमी कार्यक्रमाच्या ‘मिशन १०० डे’ अंमलबजावणीसाठी जिल्ह्यातील यंत्रणा कार्यान्वित केली आहे. या उपक्रमांतर्गत शंभर दिवसांत नागरिकांच्या सोईसुविधा, प्रशासनातील सुधारणा आणि गुंतवणूक प्रोत्साहनावर भर दिला जाणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सात जानेवारी रोजी आयोजित व्हिडिओ कॉन्फरन्सिंगनंतर जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी लेखी आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने सात सूत्रांचा वापर करण्यात आला आहे.

वेबसाइट अद्ययावत करणे : जिल्ह्याच्या अधिकृत वेबसाइटचा दर्जा सुधारून ती माहितीपूर्ण आणि नागरिकांसाठी उपयुक्त करण्यावर भर दिला जाणार आहे. नागरिकांना ऑनलाइन सुविधांचा जलद लाभ घेता यावा, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. ज्या कार्यालयांच्या वेबसाइट आहेत त्या सर्व अपडेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

Nanded Zilha Parishad
Government Scheme : ‘शासकीय योजनांची जत्रा’ कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करा

इज ऑफ लिविंग वाढविणे : नागरिकांच्या दैनंदिन जीवनातील अडचणी कमी करण्यासाठी, विविध सेवांचे सुसूत्रीकरण व सरळीकरण करण्याचे आणि समस्यांवर सोईस्कर उपाययोजना हाती घेतल्या जातील. कार्यालयीन स्वच्छता : सुंदर माझे कार्यालय या शासन निर्णयाप्रमाणे प्रशासनातील प्रत्येक कार्यालय स्वच्छ, सुटसुटीत आणि कार्यक्षम ठेवण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवली जाईल. तक्रार निवारण : नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणा अधिक प्रभावी केली जाणार आहे. यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतींचा वापर केला जाईल. विशेषता यासाठी आपले सरकार पोर्टल, सीपी ग्राम व पीजी पोर्टल व इतर ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून तक्रारी निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.

सोईसुविधा वाढविणे : नागरी सुविधा सुधारण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. शासकीय कार्यालयामध्ये स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करणे कार्यालयातील स्वच्छतागृहे अद्ययावत ठेवणे कार्यालयामध्ये अभ्यास कक्ष निर्माण करणे कार्यालय परिसराचे सुशोभीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
असा आहे कार्यक्रम
  

गुंतवणूक प्रोत्साहन : जिल्ह्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देणे आणि नवीन उद्योगांची स्थापना करण्यासाठी विशेष धोरणे आखली जातील. तातडीने सर्व परवाने संबंधितांना उपलब्ध होतील कुठेही अडवणूक होणार नाही याबाबत दक्ष राहण्याची सूचना त्यांनी केली आहे.
 क्षेत्रीय भेटी वाढविणे : अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या विविध भागांना भेट देऊन प्रत्यक्ष अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दोन दिवस क्षेत्रीय भेटीसाठी राखून ठेवावे तसेच क्षेत्रीय भेटीमध्ये शासनाच्या महत्त्वाकांक्षी व पथदर्शी योजनांचा आढावा घेण्याची निर्देश त्यांनी विभागप्रमुखांना दिले आहे.
 

वेळापत्रक आणि प्रगती आढावा : या कार्यक्रमाची सर्व अंमलबजावणी १५ एप्रिलपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, ५० दिवसांनंतर या प्रकल्पाचा आढावा घेण्यात येईल. सर्व विभागांनी एकत्रितपणे काम करत या उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी शंभर दिवसाच्या कालमर्यादेत परिपूर्णतेचे आदेश दिले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com