Legislative Council Speaker Ram Shinde Agrowon
ॲग्रो विशेष

Ram Shinde : अखेर प्रा. राम शिंदे यांची विधान परिषद सभापती म्हणून निवड; मुख्यमंत्र्यांनी मानले विरोधकांचे आभार

Election of Legislative Council Speaker : नागपूरमध्ये सध्या राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच अधिवेशनात विधानपरिषदेचे सभापती म्हणून भाजप नेते प्रा. राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये सुरू झाले असून विधानपरिषदेच्या सभापतीपदी भाजप नेते राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांसह विरोधकांचे देखील आभार मानले. विधानपरिषदेचे सभापतीपद गेल्या २९ महिन्यांपासून रिक्त होते. दरम्यान उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी कामकाज पाहिले. पण आता विधानपरिषदेला नवे सभापती मिळाले असून आजपासून राम शिंदे कामकाज पाहतील.

राज्यातील विधानसभा निवडणुकीनंतर अनेक घडामोडी घडत असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर फडणवीस यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला असून अधिवेशनाच्या पूर्वसंधेला ३३ कॅबिनेट आणि ६ राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली.

यानंतर विधानसभा सभापतीपती राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली. तर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही वेळी विरोधकांनी चेहरा दिला नाही. एकमताने राम शिंदे यांची सभापतीपदी निवड झाल्याने सर्व आमदारांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.

यानंतर राम शिंदे यांनी सभापती पदाच्या खुर्ची बसताना सर्वांचे आभार मानले. तर यावेळी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यासोबत विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानपरिषदेच्या सभापतीपदी राम शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्यावरून विरोधकांचे आभार मानले. तर विरोधकांनी आपल्या सभागृहाची परंपरा कायम राखल्याचे ते म्हणाले.

दरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांच्याकडेच सभापतीपद देण्यात यावे, अशी मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून करण्यात आली होती. मात्र भाजपने या मागणी अमान्य करत धक्कातंत्र वापरत विधान परिषद सभापती पदी राम शिंदे यांचे नाव जाहीर केले. यानंतर आज अधिवेशाच्या चौथ्या दिवशी त्यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

कोण आहेत राम शिंदे?

कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात राम शिंदे २००९ मध्ये विधानसभेवर निवडून आले होते. पण २०१४ आणि २०१९ मध्ये त्यांचा पराभव राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित पवार यांनी केला. यामुळे ते नाराज झाले होते. पण भाजपने त्यांनी विधान परिषदेत पाठवत नाराजी दूर केली आहे. इतकेच नाहीतर विधान परिषदेच्या सभापती पदी वर्णी लावून मोठं गिफ्ट दिलं आहे. याआधी ते फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री (ग्रामीण) म्हणून जबाबदारी पार पाडली. २०१९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला होता.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Procurement: दहा लाख टन कांदा खरेदीची केंद्राकडे मागणी, सकारात्मक निर्णयाची मुख्यमंत्री फडणवीसांना अपेक्षा

Farm Land Dispute: जमिनीच्या वादातून महिलेला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न

Livestock Farmers Support: चारशे पशुपालक शेतकऱ्यांना चाळीस लाखांची मदत

Scientific Dairy Farming: शास्त्रोक्त पशुपालनातून फायदेशीर दुग्ध व्यवसाय

Diesel Shortage: शेतीच्या कामांना इंधनटंचाईचा फटका

SCROLL FOR NEXT