Government Subsidy Scheme: पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेचा तेविसावा हप्ता शनिवारी (ता. २०) शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा होणार आहे. .पश्चिम बंगालमधील हुगळी जिल्ह्यातील तारकेश्वर येथे होणाऱ्या एका शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एप्रिल २०२६ ते जुलै २०२६ अशा चारमाही हप्त्याचे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात थेट वितरण होणार आहे..PM Kisan 23rd Installment Date: पीएम किसानचा २३ वा हप्ता मिळण्याची तारीख ठरली; शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती.त्यानिमित्ताने केंद्र शासनाने २० जून हा दिवस देशभर ‘पीएम किसान उत्सव दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केंद्र शासनाच्या https://pmindiawebcast.nic.in या लिंकवर उपलब्ध होईल. तसेच शेतकऱ्यांना गावातील नागरी सुविधा केंद्रांवरूनही (सीएससी) प्रक्षेपण बघता येईल..PM Kisan E-KYC: ई-केवायसी न केल्यास ‘पीएम किसान’चा हप्ता अडकणार.कृषी संचालक (विस्तार व प्रशिक्षण) रफिक नाईकवाडी यांनी सांगितले, की राज्यात आधार संलग्नता व ई-केवायसी प्रमाणीकरण या अटी पूर्ण केलेल्या ९०.८५ लाख शेतकऱ्यांना १८१७ कोटी वितरीत केले जाणार आहे..निधी जमा होतील. कृषीसह महसूल व ग्रामविकास विभागाने संयुक्तपणे हा उत्सव साजरा करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी राज्यातील विविध कृषी विज्ञान केंद्रे, जिल्हा, तालुका व ग्रामपंचायत कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समित्या, शेतकरी उत्पादक कंपन्या व प्राथमिक कृषी पतपुरवठा सोसायट्यांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.