Election Result Agrowon
ॲग्रो विशेष

Delhi Election Result: राजधानी दिल्लीवर २६ वर्षांनंतर भाजपची सत्ता

BJP Victory: राजधानी दिल्लीतील भाजपचा २६ वर्षांचा सत्तेचा वनवास अखेर संपला. विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये भाजपने आम आदमी पक्षाचा (आप) अक्षरशः धुव्वा उडविला आहे. ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती आणि सौरभ भारद्वाज या बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला.

Team Agrowon

New Delhi News: राजधानी दिल्लीतील भाजपचा २६ वर्षांचा सत्तेचा वनवास अखेर संपला. विधानसभा निवडणुकीच्या रणांगणामध्ये भाजपने आम आदमी पक्षाचा (आप) अक्षरशः धुव्वा उडविला आहे. ‘आप’चे समन्वयक अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, सत्येंद्र जैन, सोमनाथ भारती आणि सौरभ भारद्वाज या बड्या नेत्यांना पराभवाचा धक्का बसला. भाजपने सायंकाळी पाच वाजेपर्यंत सत्तरपैकी ४८ इतक्या जागांवर विजय मिळवीत बहुमत मिळविले. तर आपला २२ जागांवर समाधान मानावे लागले. कधीकाळी दिल्लीवर पंधरा वर्षे सत्ता गाजविणाऱ्या काँग्रेसला या निवडणुकीत खातेही उघडता आलेले नाही.

या विजयावर भाष्य करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकास आणि सुशासनाचा विजय झाला असल्याची सूचक प्रतिक्रिया व्यक्त करताना राजधानीच्या विकासासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू असे नमूद केले. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीयांना देण्यात आलेली घसघशीत करसवलत आणि आक्रमक प्रचार मोहिमेच्या बळावर भाजपने हे यश खेचून आणले आहे.

स्थानिक पातळीवरील प्रचारामध्ये पेयजल, सांडपाण्याची व्यवस्था आणि कचऱ्याचे नियोजन आदी घटक महत्त्वपूर्ण ठरले होते. वाढत्या प्रदूषणाचा मुद्दाही निवडणूक प्रचारामध्ये चांगलाच गाजला होता. केजरीवालांच्या आलिशान निवासस्थानाची ‘शीशमहला’शी तुलना करताना भाजप नेत्यांनी टीकेची झोड उठविली होती. यामुळे सत्ताधारी ‘आप’ला बॅकफूटवर जावे लागले होते.आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भाजपने मोठी आघाडी घेतली होती. खुद्द केजरीवाल आणि सिसोदिया हे केवळ एका फेरीपुरते आघाडीवर होते, पण नंतर त्यांनाही पराभूत व्हावे लागले.

वर्ष भाजप काँग्रेस आप (टक्केवारी)

२०१३ ३३.१ २४.६ २९.५

२०१५ ३२.२ ९.७ ५४.३

२०२० ३८.५ ४.३ ५३.६

२०२५ ४५.८ ६.४ ४३.८

दिल्लीतील जनतेने फसवणूक, छळ अन् भ्रष्टाचाराचा ‘शीशमहल’ उद्‍ध्वस्त करताना दिल्लीला ‘आप’दामुक्त केले आहे.
अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री
आम्ही विधानसभेची ही निवडणूक मोठ्या ताकदीने लढलो. आताही विरोधक म्हणून आम्ही आमची भूमिका पार पाडू. पराभव झाला असला तरीसुद्धा जनतेपर्यंत जात राहू.
अरविंद केजरीवाल, ‘आप’चे समन्वयक

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला पूरस्थितीचा आढावा; अतिरिक्त १ हजार ६०० कोटींची मदत जाहीर

Agriculture Technology: धान्य साठवणुकीतून नफ्याचे गवसले तंत्र

Cotton Import Duty: कापूस उत्पादकांच्या अस्तित्वावर घाला

Dragon Fruit Benefits: क्षेत्र वाढते, जाणीव-जागृती वाढवा

Women Empowerment: परभणीतील ग्रामीण भागात ३४ हजार एकल महिला

SCROLL FOR NEXT