
Delhi Assembly Election Results 2025 : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिल्लीकरांनी भाजपच्या बाजूने स्पष्ट बहुमत देत सलग २ टर्म सत्तेत असलेल्या 'आप' नाकारले आहे. ७० जागांपैकी ४५ जागांवर भाजप स्पष्ट आघाडी घेत विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आप पक्ष फक्त २५ जागांवर आघाडीवर आहे. एकेकाळचा गड असलेल्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. भाजप आघाडीवर असल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी, अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदीया यांचा पराभव झाल्याने आपला मोठा धक्का मानला जात आहे.
मागील २८ वर्षांपासून भाजपला दिल्लीत सत्ता नव्हती यामुळे अडिच दशकानंतर दुष्काळ संपणार असल्याने भाजपमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. भाजपच्या शेवटच्या मुख्यमंत्री सुषमा स्वराज यांना अवघ्या ५२ दिवसांचा कार्यकाळ मिळाला होता. निवडणुकीचा निकाल अद्याप जाहीर व्हायचा असला तरी भाजपकडून मुख्यमंत्री कोण? या चर्चांना उधाण आले आहे. भाजपचे दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला. तर जंगपूर विधानसभा मतदारसंघातून मनीष सिसोदियांचा पराभव झाला आहे. यामुळे दिल्लीत आपच्या अनेक दिग्गज नेत्यांना पराभावाचा सामना करण्याची वेळ आली आहे. शेवटच्या टप्प्यात मतमोजणी सुरू असल्याने भाजप जवळपास ४५ जागांवर आघाडीवर आहे. तर आम आदमी पक्ष २५ जागांवर आघाडीवर आहे. हा कल असाच राहिला तर दिल्लीत भाजपची सत्ता येईल, हे निश्चित मानलं जातं आहे.
खासदार संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा
निवडणूक निकालाच्या पाश्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. "दिल्लीतही 'महाराष्ट्र पॅटर्न' राबवण्यात आला आहे. तसेच काँग्रेस आणि आपचं मनोमिलन झालं असतं तर, ही परिस्थिती झाली नसती, पहिल्या तासाभरातच भाजपचा पराभव झाला असता. '५ वर्ष केजरीवाल यांना काम करू दिलं नाही. नायब राज्यपालांच्या हातात ताकद दिली होती. सर्व प्रमुख नेत्यांना तुरूंगात टाकलं होतं. त्याचा हा परिणाम आहे. तुम्ही सर्वांना आत टाकाल आणि निवडणुका जिंकाल, हाच पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्यात आला. दिल्लीत झालं आता बिहारमध्येही दिसत आहे". असं संजय राऊत म्हणाले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.