Vidhan Parishad Election 2024 Agrowon
ॲग्रो विशेष

Vidhan Parishad Election 2024 : भाजपकडून विधानपरिषदेसाठी ५ नावे घोषित; सदाभाऊ खोत आणि पंकजा मुंडेंचे पुनर्वसन

Legislative Council Election 2024 : विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. यादरम्यान भाजपणे आपल्या पाच जागांसाठी नावांची घोषणा केली. यात पंकजा मुंडे यांचे देखील नाव आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा २ जुलै शेवटचा दिवस आहे. विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात असतानाच मविआने जर तिसरा उमेदवार दिल्यास भाजपला वेगळा मार्ग निवडावा लागेल अशी चर्चा आहे.

यादरम्यान भाजपने आपल्या पाच जागांसाठी नावे घोषित केली आहेत. यात रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे नाव आहे. त्यामुळे या दोघांचे पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

विधानपरिषदेच्या ११ जागांची निवडणूक काहीच दिवसांवर आली आहे. यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार तयारी सुरू पहायला मिळत आहे. तर मविआकडून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार जयंत पाटील यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. तर दुसरी जागा काँग्रेसला सोडावी असा प्रस्ताव मविआच्या नेत्यांपुढे ठेवला आहे. त्यामुळे भाजपकडून कोणाची नवे पुढे येतात याकडे राज्याचे लक्ष लागले होते.

यादरम्यान भाजपने विधानपरिषदेसाठी पाच नावांची घोषणा केली. यात पंकजा मुंडे, डॉ.परिणय फुके, सदाभाऊ खोत, योगेश टिळेकर आणि अमित गोरखे यांना संधी देण्यात आली आहे.

पंकजा मुंडेंचा वनवास संपला

भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा दीर्घ काळाच्या प्रतिक्षेनंतर राजकीय वनवास संपला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराजय झाला होता. त्यानंतर अनेक वेळा विधान परिषद आणि राज्यसभेसाठी त्यांच्या नावाची चर्चा झाली.

परंतु प्रत्यक्षात त्यांना संधी देण्यात आली नाही. त्यानंतर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघातून प्रीतम मुंडे यांच्या जागी पंकजा यांना उमेदवारी देण्यात आली. परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष ( शरच्चंद्र पवार)चे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी चुरशीच्या लढतीत पंकजा यांचा पराभव केला.

त्यामुळे पंकजा यांची दिल्लीला जाण्याची संधी हुकली. त्यानंतर त्यांना राज्याच्या राजकारणात विधानपरिषदेतून संधी देण्यात यावी अशी मागणी वाढली होती. राज्यात मराठा विरूध्द ओबीसी असा राजकीय संघर्ष तापला आहे. या पार्श्वभूमीवर विधानपरिषदेसाठी पंकजा मुंडे यांच्या नावाच्या घोषणेला महत्त्व प्राप्त झाले आहे.

सदाभाऊ खोत म्हणाले, 'मी ऋणी राहीन'

भाजपने रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांच्या नावाची घोषणा केली. भाजपच्या कृपेने देवेंद्र फडणीवस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात विधानपरिषदेची आमदारकी आणि राज्यमंत्रीपद खोत यांच्या पदरात पडले होते.

परंतु ते सरकार गेल्यानंतर खोत राजकीय विजनवासात पडले होते. त्यांच्या आमदारकीची मुदत संपल्यानंतर झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा आपल्याला संधी मिळावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.

परंतु भाजपने त्यावेळी त्यांचा विचार केला नव्हता. दरम्यानच्या काळात खोत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी निष्ठा ठेवत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलने, निदर्शने यांत सहभाग घेऊन आपल्या अस्तित्वाची दखल घेतली जावी यासाठी धडपड सुरू ठेवली. त्याचे बक्षिस त्यांना मिळाले असून पुन्हा एकदा विधान परिषदेवर त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सदाभाऊ खोत यांनी, राज्यातील शेतकरी, शेतमजूर, बारा बलुतेदार यांच्यासाठी आपण उमेदवारी समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह, पक्षाचे अध्यक्ष जे.पी नड्डा, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे देखील आपण आभार मानतो.

त्यांनी मला उमेदवारी दिली. माझ्यासारख्या एका सामान्य कुटुंबातील, शेतकरी चळवळीतील, सामान्य कार्यकर्त्याला भाजपने संधी दिली. याबद्दल मी निश्चित ऋणी राहिन असेही सदाभाऊ खोत यांनी म्हटले आहे.

सध्या विधानसभेतील संख्याबळ पाहता महायुतीकडे ९, तर मविआकडे २ उमेदवार निवडून आणण्याइतकी मते आहेत. भाजप ५, एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी २ उमेदवार निवडून येऊ शकतात. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरच्चंद्र पवार) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT