Pune News : विधानसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मंगळवार (ता.२९) शेवटचा दिवस आहे. मंगळवारी दुपारपर्यंत उमेदवारी अर्ज इच्छुकांना भरता येणार आहे. यादरम्यान भाजपने २५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या विरोधात भाजपने साकोली मतदारसंघातून अविनाश आनंदराव ब्राम्हणकर यांना उमेदवारी दिली आहे. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख यांच्याविरोधात अर्चना शैलेश पाटील चाकूरकर यांना मैदानात उतरवले आहे.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून आतापर्यंत दोन याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत ९९ उमेदवारांची घोषणा भाजपने केली होती. यानंतर दुसऱ्या यादीत २२ उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. आता तिसऱ्या यादीनंतर भाजपचे १४६ उमेदवार झाले आहेत. जे महायुतीतील सर्वाधिक उमेदवार आहेत.
भाजपने जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत माळशिरसमधून राम सातपुते यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. सातपुतेंचा लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे यांनी पराभव केला होता. तसेच आष्टीमधून सुरेश धस, वर्सोव्यातून भारती लव्हेकर तर आशिष देशमुख यांना सावनेर मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपचे तिसऱ्या यादीतील उमेदवार
सुरेश रामचंद्र धस (आष्टी), पराग किशोरचंद्र शहा (घाटकोपर पूर्व), भारती हेमंत लव्हेकर (वर्सोवा), संजय उपाध्याय (बोरिवली), स्नेहा प्रेमनाथ दुबे (वसई), अर्चना शैलेश पाटील चाकूरकर (लातूर शहर), अविनाश आनंदराव ब्राह्मणकर (साकोली), राम विठ्ठल सातपुते (माळशिरस), मनोज भीमराव घोरपडे (कराड उत्तर), संग्राम संपतराव देशमुख (पलूस-कडेगाव), हरीश मारोतीअप्पा पिंपळे (मूर्तिजापूर एससी)), साईप्रकाश डहाके (कारंजा), राजेश श्रीराम वानखडे (तेओसा), सुमित किशोर वानखेडे (एरवी), उमेश (चंदू) आत्मारामजी यावलकर (मोर्शी), चरणसिंग बाबुलालजी ठाकूर (काटोल), डॉ.आशिष रणजित देशमुख (सावनेर), प्रवीण प्रभाकरराव दटके (नागपूर मध्य), सुधाकर विठ्ठलराव कोहळे (नागपूर पश्चिम), डॉ मिलिंद पांडुरंग माने (नागपूर उत्तर (एससी)), किशोर गजाननराव जोरगेवार (चंद्रपूर (एससी)), राजू नारायण तोडसाम आर्णी ((एससी)), किशन मारुती वानखेडे (उमरखेडे), जितेश रावसाहेब अंतापूरकर (देगलूर), सुरेश मेधाला होकार दिला (डहाणू)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.