Jowar Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Bird Conservation: पक्ष्यांसाठी सोडले ज्वारीचे साडेचार एकर शेत

Jowar Farming: चाकण जवळील खराबवाडी (ता. खेड) येथे साडेचार एकर उभे ज्वारीचे पीक पाखरांच्या चाऱ्यासाठी सोडले आहे, असे शेतकरी प्रवीण शहा यांनी सांगितले. मुबलक चारा पक्ष्यांना मिळावा, यासाठी प्रवीण शहा गेली सतरा वर्षे हा उपक्रम राबवतात.

Team Agrowon

Chakan News: चाकण जवळील खराबवाडी (ता. खेड) येथे साडेचार एकर उभे ज्वारीचे पीक पाखरांच्या चाऱ्यासाठी सोडले आहे, असे शेतकरी प्रवीण शहा यांनी सांगितले. मुबलक चारा पक्ष्यांना मिळावा, यासाठी प्रवीण शहा गेली सतरा वर्षे हा उपक्रम राबवतात. त्यांच्या उपक्रमामुळे पाखरे हक्काने त्यांच्या शेतात येतात.

त्यामुळे दरवर्षी हिवाळ्याच्या दिवसांत हक्काचे शेत म्हणून या शेतात पक्षी येतात. सध्या कडब्याच्या चाऱ्यालाही मोठी मागणी आहे.

रानात, शिवारात फिरणाऱ्या पाखरांसाठी काही शेतकरी गोफणीने, बिलवरीने दगड मारून पाखरांना हकलतात. त्यामुळे पाखरांच्या चाऱ्याची मोठी गैरसोय होते. त्यामुळे चाऱ्यासाठी पाखरांना रानोरान वणवण करावी लागते.

याबाबत शेतकरी प्रवीण शहा यांनी सांगितले, की चाकण परिसरात मोठी औद्योगिक वसाहत झाल्याने जमिनीचे क्षेत्र घटले आहे.

त्यामुळे पक्ष्यांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. पक्ष्यांना हक्काचा चारा मिळत नसल्याने पाखरे दुर्मीळ होत आहेत. त्यांना हक्काचा चारा मिळावा, यासाठी गेली सतरा वर्षे हा उपक्रम राबवतोय. त्यामुळे मला समाधान वाटते आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Farming Success: दुष्काळी पट्ट्यात संघर्षातून यशस्वी केल्या फळबागा

Grape Farming Success Story: देश, परदेशातील मार्केटनुसार विविध वाणांची द्राक्षशेती

MSEDCL Worker Safety: ‘राज्यातील वीज कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हरियाना पॅटर्न राबवा’

IITM Climate Centre: ‘आयआयटीएम’ उभारणार हवामान संदर्भ केंद्र

Sugarcane Crushing Season: भीमाशंकर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता

SCROLL FOR NEXT