Jowar Sowing : अहिल्यानगरला ज्वारीच्या क्षेत्रात घट

Sorghum Cultivation : यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा रब्बी पेरणी क्षेत्रात वाढ झाली असली, तरी ज्वारीचे पेरणी क्षेत्र मात्र ३२ हजार हेक्टरने कमी झाले आहे.
Sorghum Crop
Jowar Agrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News : बाजारात ज्वारीला मागणी असूनही खर्चाच्या तुलनेत अपेक्षित दर मिळत नाही. त्यामुळे ज्वारीचे क्षेत्र वरचेवर कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे. यंदा अहिल्यानगर जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा रब्बी पेरणी क्षेत्रात वाढ झाली असली, तरी ज्वारीचे पेरणी क्षेत्र मात्र ३२ हजार हेक्टरने कमी झाले आहे.

यंदा सरासरीच्या केवळ ५५.८३ टक्के म्हणजे १ लाख ४९ हजार ५२७ हेक्टरवर ज्वारीचा पेरणी झाल्याची कृषी विभागाची माहिती आहे. गतवर्षी १ लाख ८२ हजार ९ हेक्टरवर पेरणी झाली होती. समाधानाची बाब म्हणजे केवळ जामखेड तालुक्यात सरासरीपेक्षा दोन हजार हेक्टरने तर अकोल्यातही अधिक ज्वारी पेरली गेलीय.

Sorghum Crop
Jowar Fodder : रब्बी पिकांचा चारा पुढील महिन्यात मिळणार

अहिल्यानगर जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख ५८ हजार ६३५ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत ४ लाख ३६ हजार ७०४ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड, पारनेर, श्रीगोंदा, अहिल्यानगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत या तालुक्यांत रब्बीत ज्वारीचे प्रमुख पीक असते.

Sorghum Crop
Summer Jowar Sowing : उन्हाळी ज्वारी लागवड तंत्र आणि महत्वाचे वाण

मात्र अलीकडच्या दहा वर्षांचा विचार केला तर ज्वारीचे क्षेत्र वरचेवर कमी होत आहे. ज्वारीला बाजारात मागणी आहे. कृषी विद्यापीठाने ज्वारीचे अधिक उत्पादन देणारे वाण विकसित केलेले असूनही क्षेत्र कमी होत असल्याची चिंतेची बाब आहे.

ज्वारीचे यंदा २ लाख ६७ हजार ८३४ हेक्टर सरासरी क्षेत्र कृषी विभागाने निश्‍चित केले होते. त्यापैकी आतापर्यंत १ लाख ४९ हजार ५२७ हेक्टरवर (सरासरीच्या ५५.८३ टक्के) पेरणी झाली आहे.

गेल्या वर्षी १ लाख ८२ हजार ९ हेक्टरवर पेरणी झाली होती. म्हणजे यंदा गतवर्षीपेक्षाही ३२ हजार हेक्टरने ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. गेल्या दहा वर्षांचा विचार केला तर सुमारे तीन लाख हेक्टरने ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. प्रामुख्याने ज्वारीचे पीक असलेल्या पारनेर, श्रीगोंदा, अहिल्यानगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत या सर्वच तालुक्यांत सरासरीपेक्षा कमालीचे क्षेत्र घटले आहे.

समाधानाची बाब म्हणजे यंदा जामखेडला सरासरीपेक्षा २ हजार हेक्टरने अधिक पेरणी झाली. उत्तरेतील अकोल्यात यंदा ५०० हेक्टरवर ज्वारी पेरली गेलीय. तेथे ज्वारी फारशी पेरली जात नाही. राज्यात अहिल्यानगर, सोलापूर, मराठवाड्यातील काही जिल्हे ज्वारीचे आगार संबोधले जातात. ज्वारीला बाजारात मागणी असतानाही क्षेत्र कमी होत असल्याने मात्र अलीकडच्या काळात वरचेवर ज्वारीचे क्षेत्र कमी होणे ही चिंतेची बाब असल्याचे जाणकारांचे मत आहे. ज्वारीला बाजारात पुरेसा दर नसल्याची स्थिती आहे.

ज्वारीचे यंदाचे पेरणी क्षेत्र

कंसात सरासरी क्षेत्र (हेक्टर)

अहिल्यानगर १५७९५ (३५७७४)

पारनेर २८३९२ (५४१३५)

श्रीगोंदा १२३१२ (३७२०१)

कर्जत २२९३५ (५०१४३)

जामखेड ३९७१० (३७५९४)

शेवगाव २३३५ (९८३१)

पाथर्डी १३७८७ (२०५८६)

नेवासा १४६३ (७४१७)

राहुरी २९४० (३२२१)

संगमनेर ४५०५ (५७१८)

अकोले ५६७ (५.८)

कोपरगाव ६९२ (१७१३)

श्रीरामपूर ५३६ (१०५१)

राहाता ३४५८ (३४१०)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com