Sustainable Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Sustainable Farming: शाश्वत शेतीसाठी जैवविविधतेचे संवर्धन करा

Biodiversity: शाश्वत शेतीसाठी जल, जमीन, जंगल या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करावे लागेल. जैवविविधतेचे संवर्धन करावे लागेल.

Team Agrowon

Parbhani News: शाश्वत शेतीसाठी जल, जमीन, जंगल या नैसर्गिक संसाधनाचे संरक्षण करावे लागेल. जैवविविधतेचे संवर्धन करावे लागेल. जमीनीतील सेंद्रिय कर्ब वाढीसाठी प्रयत्न करावे माती, पाणी, अन्नाचे प्रदूषण रोखण्यासह मृद, जलसंधारणाच्या उपायांवर भर द्यावा लागेल, असा सूर शाश्वत शेती दिनी गुरुवारी (ता. ७) आयोजित चर्चासत्रात उमटला. 

हरित क्रांतींचे जनक भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी निमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, आत्मा, कृषी विज्ञान केंद्रयांच्यातर्फे विद्यापीठात आयोजित शाश्वत शेती दिन कार्यक्रमास कुलगुरु डॉ. इंद्रमणी मिश्रा ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते. शिक्षण संचालक डॉ. भगवान आसेवार

संशोधन संचालक डॉ. खिजर बेग, विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रवीण वैद्य, आत्माचे प्रकल्प संचालक दौलत चव्हाण, अभिषेक घोडके, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत भोसले, कृषी विकास अधिकारी दीपक सामाले

मुख्य विस्तार शिक्षण अधिकारी डॉ. प्रशांत भोसले, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. आनंद गोरे, डॉ. कैलास डाखोरे, कृषिभूषण मधुकर घुगे, बाबासाहेब रन्हेर, सोमेश्वर गिराम, नरेश शिंदे, डॉ. प्रितम भुतडा आदींची उपस्थिती होती. डॉ. इंद्र मणी म्हणाले, की कृषी विद्यापीठांना शेतकऱ्यांच्या खुशालीसाठी काम करावे लागेल. अन्न व शांतता हे सोबत चालतात.

शाश्वत शेतीतील योगदानाबद्दल सन्मानित शेतकरी सन्मान... 

कृषिभूषण मधुकर घुगे, बाबासाहेब रणेर, सोमेश्वर गिराम, नरेश शिंदे, दिलीप अंभुरे, जर्नादन आवरगंड, प्रताप काळे, ज्ञानेश्वर देशमाने, पशुपतीनाथ शेवटे, भगवान कुगे, नंदकुमार जोगदंड, छाया कदम, अर्चना थोरात, प्रिती डोंबे, सुप्रिया घुले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pomegranate Fruit Drop: डाळिंबातील फुलगळीची कारणे काय?

Farmers Issues: दोन लाखांच्या मर्यादेमुळे फळबागधारक कर्जमाफीपासून वंचित

PM POSHAN Shakti: कागदावर पौष्टिक मेनू; प्रत्यक्षात साधी खिचडी !

Agriculture Expo: के. के. वाघ कृषी महोत्सवात फलोत्पादनाचे ‘लाईव्ह प्लॉट्स’

Chia Cultivation: पूर्व विदर्भात ‘चिया’ लागवडीला चालना

SCROLL FOR NEXT