Water Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Water Shortage : डोणवत धरणाच्या पाणी पातळीत मोठी घट

Water Crisis : खालापूर तालुक्यातील डोणवत धरणातील साठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

Team Agrowon

Khopoli News : खालापूर तालुक्यातील डोणवत धरणातील साठ्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्‍यामुळे मार्चच्या पहिल्‍या आठवड्यापासूनच काही गावांना पाणीटंचाई भासू लागली आहे. पुढील दोन महिने टंचाईच्या झळा आणखी तीव्र होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

वावोशी ग्रामपंचायतीत टॅंकरद्वारे नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्‍ध करून देण्यात आले आहे. डोणवत धरणातील साठा यंदा ५० टक्‍क्‍यांवर आला आहे. धरणातील बहुतांश पाणी औद्योगिक वसाहतींना दिले जाते. पाण्याचा व्यावसायिक वापर बंद करण्यात यावा, अशी मागणी डोणवत धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या गावातील ग्रामस्थांनी केली आहे.

धरणाच्या पाण्यावर अनेक जलजीवन योजना राबवण्याचे काम सुरू आहे, मात्र साठा झपाट्याने कमी होत असल्‍याने भविष्‍यात या योजनांचे काय होणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. गतवर्षीही धरणाने तळ गाठला होता, मात्र तरीही गळती थांबवण्याबाबत तसेच गाळ काढण्याबाबत योग्‍य निर्णय न झाल्‍याने टंचाईचे संकट घोंगावत असल्‍याचे परिसरातील नागरिकांकडून बोलले जात आहे.

वावोशी गाव, भीमनगर व आदिवासी वाडी तसेच परखंदे धनगरवाडा, नंदनपाडा आदी गावातील पाण्याची टंचाई भासू लागली आहे. मात्र या गाव-वाड्यांचा पंचायत समितीच्या आराखड्यात समावेश नसल्याने ग्रामस्‍थांमध्ये नाराजी आहे.

खालापुरात जलजीवन योजनांच्या माध्यमातून लोकांना नळाद्वारे पाणी देण्याचे काम सुरू आहे. मात्र या योजनांना पाण्याचा दाखविलेला स्रोत चुकीचा असल्याने अनेक योजना पाण्याविना बंद पडतात की काय, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

पंचायत समितीच्या आराखड्यात त्रुटी

खालापूर पंचायत समितीच्या २०२३-२४ च्या आराखड्यात उसरोली, उजळोली व तलाशी या तीन गावांसह चिलठण बुध्दभूषण नगर, खड‌ई वाडी, खानाव आदिवासी वाडी, हाळखुर्द वाडी, मधला हाळ, वळवण, उंबरवीरा ठाकूरवाडी, चिंबोडा ठाकूरवाडी, बिवळावाडी, खोडावाडी, मुठा माडप, सारंग वाडी, गारमाळ, निफाड वाडी आदी १४ वाड्यांच्या समावेश करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT