Solar Power  Agrowon
ॲग्रो विशेष

Solar Power : सौरऊर्जेच्या प्रकाशात उजळणार भोर तालुक्यातील शाळा

Solar Energy : शाळांच्या गरजेनुसार दोन किंवा तीन केव्ही सौर पॅनल यंत्रणा तसेच इन्व्हर्टर बॅटरी बॅकअप बसविण्यात येणार आहे.

Team Agrowon

Pune News : तालुक्यातील दुर्गम आणि डोंगरी भागातील माध्यमिक आणि जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थांना विजेचे भारनियमन, शाळांना वीज जोड न मिळणे, वीजपुरवठा खंडित होणे यामुळे शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते.

या पार्श्‍वभूमीवर टिटेघर येथील ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा कोर्ले, वडतुंबी, टिटेघर, धोंडेवाडी (चिखलगाव), कर्णावड, माध्यमिक विद्यालय रायरेश्वर (टिटेघर) शाळांना सौरऊर्जा यंत्रणा बसविण्यात येणार असल्याचे ‘ध्रुव’चे अध्यक्ष राजीव केळकर यांनी सांगितले. शाळांच्या गरजेनुसार दोन किंवा तीन केव्ही सौर पॅनल यंत्रणा तसेच इन्व्हर्टर बॅटरी बॅकअप बसविण्यात येणार आहे.

दुर्गम भागातील शाळांची वीज उपयुक्तता, वारंवार येणारी वीजबिल समस्या यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी ध्रुव प्रतिष्ठानच्या वतीने हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

यासाठी महाराष्ट्र राज्य महापारेषण कंपनीचे सहकार्य मिळणार आहे. तर यामुळे शाळा वीजबिल मुक्त होणार आहेत.

तसेच वीजबिलाचा प्रश्न कायमचा मिटणार असल्याने सातत्याने खंडित होणारा वीजपुरवठा आता अखंडित राहण्यास मदत होणार आहे. परिणामी शाळांची शैक्षणिक प्रगती उंचावणार असून गुणवत्ता वाढीस मदत होणार असल्याचे केंद्रप्रमुख अंजना वाडकर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT