Solar Pump Scheme : सौर कृषिपंप योजनेसाठी जिल्ह्यात तब्बल २७ हजार ८२५ अर्ज दाखल!

Farmers Application : सौर कृषिपंप योजनेतील मंजूर चार हजार ३० अर्जांचे सर्वेक्षण सुरू असून, कुसुम योजनेतून तीन हजार ६१ सौर कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत.
Solar Pump
Solar PumpAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सरकारने नुकतेच सुरू केलेल्या मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेसाठी जिल्ह्यात आठ हजार ५९२ तर कुसुम योजनेंतर्गत १९ हजार २३३ अशा २७ हजार ८२५ शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज केले आहेत. मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतील मंजूर चार हजार ३० अर्जांचे सर्वेक्षण सुरू असून, कुसुम योजनेतून तीन हजार ६१ सौर कृषिपंप कार्यान्वित झाले आहेत.

सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सौर कृषिपंप किमतीच्या १० टक्के तर अनुसूचित जाती-जमातीच्या शेतकऱ्यांसाठी सौर कृषिपंप किमतीच्या पाच टक्के रक्कम भरून सौर कृषीपंपाचा पूर्ण संच दिला जाणार आहे. उर्वरित रक्कम राज्य व केंद्र सरकारकडून अनुदान म्हणून दिली जाणार आहे. सौर कृषीपंपाची देखभाल व दुरुस्तीचा कालावधी पाच वर्षे राहणार आहे. या कालावधीत सौर कृषिपंप नादुरुस्त झाल्यास विनामूल्य दुरुस्ती करण्याची जबाबदारी अर्ज करताना शेतकऱ्याने निवडलेल्या यंत्रणेकडे राहणार आहे.

Solar Pump
Agriculture Solar Pump : राज्यात एक लाख ८० हजार सौर कृषिपंप

तसेच वादळासारख्या आपत्तीत सौर पॅनेलचे नुकसान, त्याची चोरी किंवा तोडफोड झाल्यास यंत्रणेकडून विम्याचे संरक्षणही मिळणार आहे. याशिवाय वैयक्तिक किंवा सामूहिक शेततळे, विहीर, बोअरवेल, बारमाही वाहणारी नदी-नाला यांच्या शेजारील शेतकरी या योजनेसाठी पात्र राहतील. मात्र, जलसंधारण साठ्यातून पाणी उपशासाठी या पंपाचा वापर करता येणार नाही. अटल सौर कृषिपंप योजना एक व दोन, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेचा लाभ न घेतलेले शेतकरी या योजनांसाठी पात्र असतील.

क्षेत्रानुसार मिळणार पंप

शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनीच्या क्षेत्रानुसार पंप मिळतील. २.५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना तीन अश्‍वशक्ती, २.५ ते ५ एकरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना पाच अश्‍वशक्ती आणि पाच एकरपेक्षा जास्त जमीन असलेल्या शेतकऱ्यांना ७.५ अश्‍वशक्तीचे सौर कृषिपंप मिळेल.

सौर ऊर्जानिर्मिती पॅनेल्समधून २५ वर्षे वीजनिर्मिती होत असल्याने एकदा संच बसवला की शेतकऱ्याला २५ वर्षे हक्काचे व स्वतंत्र सिंचनाचे साधन उपलब्ध होणार आहे. याशिवायवीजपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत नसल्याने दिवसा पिकांना पाणी देता येईल. भारनियमनामुळे रात्री पिकांना पाणी देण्याचा त्रास घ्यावा लागणार नाही. त्यामुळे ही योजना शेतकऱ्यांसाठी लाभदायी ठरणारी असल्याने त्यांनी याचा लाभ घ्यावा.

तीन हजार शेतकरी अपात्र

कुसुम योजनेंतर्गत प्राप्त अर्जांपैकी तीन हजार ९२८ शेतकरी अपात्र ठरले आहेत. ११ हजार ६८३ शेतकऱ्यांनी पैशांचा भरणा केला आहे. ११ हजार ६६५ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप पुरवठ्यासाठी यंत्रणेची निवड केली आहे.

Solar Pump
Solar Agriculture Pump : ‘सौर कृषिपंपा’साठी अर्जांचा पाऊस

मागेल त्याला सौर कृषिपंप आकडेवारी

प्राप्त अर्ज ८,५९२

मंजूर अर्ज ४,०३०

नामंजूर अर्ज २२७

त्रुटीमुळे प्रलंबित १,७४९

छाननी प्रक्रियेत २,५८६

शेतकऱ्यांनी भरावयाची रक्कम

तीन अश्‍वशक्ती २२,९७१

पाच अश्‍वशक्ती ३२,०७५

सात अश्‍वशक्ती ४४,९२९

कुसुम योजनेसाठी तालुकानिहाय प्राप्त व मंजूर अर्ज

बार्शी २,४१० १,९७६

माढा २,७९७ २,४६१

करमाळा २,२९६ १,६१३

माळशिरस ५,१९३ ४,०७१

पंढरपूर २,९४० २,४५५

मंगळवेढा १०५५ ७०७

सांगोला ६३३ ४६६

उत्तर सोलापूर ३७४ ३१२

दक्षिण सोलापूर २२८ १७१

क्कलकोट ३६५ २७९

मोहोळ ९४२ ७९४

एकूण ९,२३३ १५,३०५

(स्रोत : महावितरण)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com