Bhojapur Dam Agrowon
ॲग्रो विशेष

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

Dam Water Level : सिन्नर व संगमनेर तालुक्यातील गावातील पाणी योजना व सिंचनाचे क्षेत्र धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे धरण भरण्याकडे दोन्ही तालुक्याचे लक्ष लागून होते.

Team Agrowon

Nashik News : सिन्नर तालुक्यातील भोजापूर धरण ओव्हर फ्लो झाले असून, सिन्नर व संगमनेर तालुक्यातील ३१ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न संपुष्टात आला आहे. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर काहीसा कमी असल्याने धरणाचा सांडवा अवघा १०० क्यूसेकच्या क्षमतेने वाहत आहे.

सिन्नर व संगमनेर तालुक्यातील गावातील पाणी योजना व सिंचनाचे क्षेत्र धरणावर अवलंबून आहेत. त्यामुळे धरण भरण्याकडे दोन्ही तालुक्याचे लक्ष लागून होते. बुधवारी (ता.२) दुपारी दोन वाजता सांडव्यातून पाणी वाहू लागले.

धरणाची क्षमता ३६१ दशलक्ष घनफूट इतकी आहे. मनेगावसह २२ गावे, कणकोरीसह पाच गावे व याशिवाय संगमनेर तालुक्यातील निमोण, निमोणसह चार ते पाच गावांची योजना धरणावर अवलंबून आहे.

शिवाय खरिपासह रब्बीला धरणातून आवर्तन सोडले जाते. धरणावर २४ पेक्षा अधिक गावांना कालव्याद्वारे पाणी देण्यात येते. दोन्ही तालुक्यात किमान १८०० हेक्टरहून अधिक क्षेत्राला त्याचा लाभ होतो.

मे महिन्यात अवकाळी पावसाने धरणात उपयुक्त जलसाठा टिकून होता. त्यानंतर झालेल्या जोरदार पावसाने म्हाळुंगी नदीला पूर येऊन धरणातील जलसाठा वेगाने वाढण्यास मदत झाली. तर चार दिवसांपासून पाणलोट क्षेत्रातील विश्रामगड परिसरात पावसाची रिपरिप कायम आहे. पावसाचा जोर काहीसा कमी असला तरी म्हाळुंगी नदी प्रवाहित असल्याने धरण भरले गेले.

३४ दिवस धरण तुडुंब

धरणाच्या इतिहासात विक्रमी वेळात धरण ओव्हरफ्लो झाल्याची ही पहिलीच वेळ आहे. गेल्या वर्षी ४ आॅगस्टला धरण भरले होते. यंदा तुलनेने ३४ दिवस अगोदर ते भरले आहे. त्यामुळे धरणाच्या लाभ क्षेत्रात आनंद व्यक्त केला जात आहे. धरणातील सांडव्याच्या पाण्याने संगमनेर तालुक्यातील बंधारेही भरण्यास मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Monsoon Heavy Rain: घाटमाथ्यावर जोरदार सरी

Maharashtra Rain Alert: राज्यात पावसाचा जोर वाढणार; कोकण, घाटमाथ्यावर ‘ऑरेंज अलर्ट’

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

SCROLL FOR NEXT