Ujani dam Discharge : ‘उजनी’तून ‘भीमे’त आजपासून ५००० क्युसेकचा विसर्ग

Flood Alert Pancharpur : चंद्रभागेच्या वाळवंटात दीड ते दोन लाख भाविक मावतात, पण नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग १५ ते २० हजार क्युसेकपर्यंत राहिल्यास वाळवंटात वारकऱ्यांना थांबता येणार नाही.
Ujani Dam
Ujani DamAgrowon
Published on
Updated on

Solapur News : उजनी आणि वीर धरणाकडून सुरू असलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे पंढरपुरात चंद्रभागेला पूरस्थितीची शक्यता आहे. नेमकी आषाढी वारी या कालावधीत येत असल्याने संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी उजनी धरणातून भीमेत सोडण्यात येणारा पाण्याचा विसर्ग नियंत्रित करण्यासाठी मंगळवारी (ता. १) केवळ ५००० क्युसेक एवढेच पाणी भीमा नदीत सोडण्यात येणार आहे. तर वीर धरणाकडून येणारे पाणी पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे.

चंद्रभागेच्या वाळवंटात दीड ते दोन लाख भाविक मावतात, पण नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग १५ ते २० हजार क्युसेकपर्यंत राहिल्यास वाळवंटात वारकऱ्यांना थांबता येणार नाही. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून हे प्रयत्न सुरू आहेत. उजनी धरणाच्या वरच्या पाणलोट क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग धरणाकडे आणि धरणातून पुढे भीमा नदीत सुरूच आहे.

Ujani Dam
Ujani Dam: ‘उजनी’तून भीमा नदीत १५ हजार क्युसेकने विसर्ग

यंदाच्या वारीला पंढरपुरात किमान १० ते १५ लाखांहून अधिक वारकरी येण्याचा अंदाज आहे. प्रशासनाकडून आषाढीवारीची सर्व तयारी करण्यात आली आहे, पण प्रशासनाच्या दृष्टीने नदीतील पाण्याचे नियंत्रण हा विषय चिंतेचा झाला आहे.

Ujani Dam
Ujani Dam: उजनी धरणातील पाणीसाठा ६३ टक्क्यांवर

तूर्त वीर धरणाकडील विसर्ग थांबवणे शक्य आहे, पण उजनीकडून भीमेत येणारा विसर्ग थांबवणे शक्य नाही. त्यामुळेच सध्या सुरू असलेला १५ हजार क्युसेकचा विसर्ग कमी करून का होईना, पण विसर्ग सुरू ठेवावच, लागणार आहे. त्यासाठीच मंगळवारपासून ५००० क्युसेक इतका विसर्ग करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘उजनी’ची पातळी ७१.९० टक्क्यांवर

उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्राकडून येत असलेल्या विसर्गामुळे धरणाच्या पाणीपातळीने शंभर टीएमसीची पातळी ओलांडली आहे. सोमवारी (ता. ३०) धरणात एकूण पाणीपातळी ४९५.४८५ मीटरपर्यंत राहिली. तर पाण्याचा एकूण साठा १०२.१८ टीएमसी आणि त्यापैकी उपयुक्त साठा ३८.५२ टीएमसी एवढा राहिला. तर या पाण्याची टक्केवारी ७१.९० टक्के इतकी राहिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com