Bhogawati Sugar Factory agrowon
ॲग्रो विशेष

Bhogawati Sugar Factory : भोगावती साखर कारखाना निवडणूक, आरोप प्रत्यारोपांनी मैदान तापलं

Bhogawati Sugar Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भोगावती साखर कारखान्याची निवडणुक प्रक्रीया सुरू झाली आहे.

sandeep Shirguppe

Sugarcane News Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या भोगावती साखर कारखान्याची निवडणुक प्रक्रीया सुरू झाली आहे. भोगावती साखर कारखान्याचे १९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर जवळपास २२ हजार सभासद असलेल्या या कारखान्याच्या निवडणुकीतून एकप्रकारे विधानसभेची रंगीत तालीम होत असल्याचे दिसून येत आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधक निवडणुकीच्या प्रचारात मैदान तापवत असल्याचे दिसून येत आहे.

काल कारखान्याच्या सत्ताधारी गटाकडून मेळावा आयोजीत केला होता यावेळी पीएन पाटील म्हणाले की, कोणत्याही प्रकारची उपपदार्थ निर्मिती नसतानाही आर्थिक अडचणीतील भोगावती साखर कारखाना सक्षमपणे चालवला आहे. काटकसर व पारदर्शक कारभार नी करत ऊस उत्पादक व कर्मचाऱ्यांना न्याय द्यायचे काम प्रामाणिकपणे केले.

भोगावती कारखाना सुरळीतपणे मार्गावर आणण्यासाठी आगामी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आम्हाला कोणाचेही वावडे नाही,' असे प्रतिपादन भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष आमदार पी. एन. पाटील यांनी केले. दरम्यान, डिस्टलरीसह इथेनॉल प्रकल्पही सुरू करणार असून कारखाना लवकरच कर्जमुक्त होणार आहे. त्यामुळे सभासदांनी अपप्रचाराला बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

'१९८९ पासून भोगावती साखर कारखान्याचे नेतृत्व केले असून गेल्या सहा वर्षात कारखाना मार्गावर आणण्यासाठी जिवाचे रान केले आहे. त्यामुळे मी निवडणूक रिंगणात नसलो तरी 'भोगावती' चे सभासद व कामगारांच्या हितासाठी मी 'भोगावती 'च्या पाठीशी हिमालयाप्रमाणे उभा आहे', असा विश्वास पी. एन. पाटील यांनी व्यक्त केला.

विरोधकही आक्रमक

संचालक मंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे भोगावती साखर कारखाना कर्जाच्या गर्तेत आहे. तसेच नोकरांना पगार, सभासदांना साखर ही वेळेत मिळत नसल्याचा आरोप आरोप भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील- कौलवकर यांनी केला.

पाटील म्हणाले की, 'आम्ही ६ लाख टन उसाचे गाळप केले होते. तसेच सभासदांना वेळेवर साखर, कामगारांना पगार दिले. १३ च्या वर उतारा कायम ठेवला. मात्र सत्ताधारी संचालक मंडळाने कारखाना कर्जात बुडवला आहे.

सभासदांना वेळेत साखर नाही, कामगारांना पगार नाही. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ८ कोटी रुपये दिलेले नाही. भोगावतीला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला साथ द्या.' शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. जे. जी. पाटील म्हणाले, 'भोगावती कारखाना बिनविरोध नाही,' होण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असल्याचा विरोधकांनी आवाज उठवला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT