Cow Milk Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : दुधाच्या अनुदानासाठी उपमुख्यमंत्र्यांना कात्रज डेअरीच्या अध्यक्षांचे साकडे

Pune District Cooperative Milk Producers Union : गेल्या अनेक दिवसांपासून दूध दर आणि दुधाच्या अनुदानाचा प्रश्न गंभीर होत असून शेतकऱ्यांत रोष आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : गेल्या काही महिन्यापासून दुधाचे भावात सतत घसरण होत आहे. सरकारी अनुदान देखील दूध उत्पादकांना मिळत नाही. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी हैराण झाला असून आता आक्रमक झाला आहे. तर याच प्रश्नावरून राज्यातील दूध उत्पादक आणि शेतकरी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत.

यादरम्यान दुध उत्पादक शेतकऱ्यांना रखडलेले प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान शासनाने तातडीने द्यावे, अशी मागणी पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ तथा कात्रज दूध डेअरीचे अध्यक्ष भगवान पासलकर यांनी केली आहे. याबाबतचे निवेदन पासलकर यांनी बुधवारी (ता.२६) उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबईत भेट घेऊन दिले.

शेतकऱ्यांच्या मागणी मान्य करून लवकर अनुदान देण्यात यावे, अशी मागणी करताना, राज्यातील दूध उत्पादक शेतकरी पडणाऱ्या दुधाच्या भावामुळे त्रस्त झाल्याचे पासलकर यांनी सांगितले. तर सध्या दुधाचा प्रतिलिटरचा भाव २६ ते २७ रुपयांवर आला आहे.

त्यामुळे दूध व्यवसाय आणि दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आल्याचे पासलकर यांनी सांगितले. पासलकर यांनी, दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीकडे अजित पवार यांचे लक्ष वेधले. तर शासनाने पूर्वीप्रमाणेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाच रुपयांचे अनुदान द्यावे, अशी मागणी केली आहे.

तसेच पशुखाद्य आणि चाऱ्याच्या किंमती वाढल्याने दुध उत्पादक शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर दुधाला भाव मिळत नसल्याने अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे.

त्यातच शासनाने दिलेले अनुदान देखील मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रतिलिटरमागे चार ते पाच रुपयांचा तोटा दूध उत्पादकांना सहन करावा लागत असल्याचेही पासलकर यांनी अजित पवार यांना सांगितले.

दरम्यान दूध संघाबाबच्या अडचणींचा पाढा देखील पासलकर यांनी अजित पवार यांच्यासमोर वाचला. दूध संघात अतिरिक्त दूध शिल्लक राहत आहे. त्याचा देखील फटका संघाला बसत असून शिल्लक दूध खासगी डेअरीला विक्री करावे लागत आहे. यामुळे संघाला तोटा सहन करावा लागत आहे. त्यामुळे अतिरिक्त दूध सरकारने पावडर उत्पादनासाठी घ्यावे, अशीही मागणी पासलकर यांनी अजित पवार यांच्याकडे केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bhaskar Jadhav In Assembly: शेतकरी आत्महत्या, कृषी योजना आणि खोट्या आश्वासनांवरून जाधवांनी सरकारला धरले धारेवर

Group Farming : गटशेती हा शाश्‍वत शेतीचा प्रभावी पर्याय ठरू शकतो

Parbhani Rainfall : जून महिन्यात सरासरीहून कमी पाऊस

Farmer Aid Cancellation: नैसर्गिक आपत्तीच्या मदतीत कपात, शेतकऱ्यांची फसवणूक; वड्डेटीवारांचा सरकारवर निशाणा

Raj-Udhhav Unity : ठाकरे बंधूंची एकजूट पालिकेतही दिसावी

SCROLL FOR NEXT