Malegaon Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Malegaon Sugar Factory : माळेगाव कारखान्यास बेस्ट शुगर फॅक्टरी पुरस्कार

Deccan Sugar : माळेगाव साखर कारखान्याने नेहमीच उच्चांकी गाळप केले असून, शेतकऱ्यांना उच्चांकी दर दिला.

Team Agrowon

Pune News : दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन-इंडियातर्फे माळेगाव (ता. बारामती) सहकारी साखर कारखान्यास सन २०२४ चा ‘बेस्ट शुगर फॅक्टरी’ हा पुरस्कार नुकताच पुण्यात प्रदान करण्यात आला.

माळेगाव साखर कारखान्याने नेहमीच उच्चांकी गाळप केले असून, शेतकऱ्यांना उच्चांकी दर दिला. तसेच संस्थाही आर्थिक दृष्ट्या सक्षम ठेवली. यात प्रशासन व संचालक मंडळाचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. त्यामुळेच राज्यात सहकारी साखर कारखानदारीमध्ये माळेगाव अव्वल स्थानावर आला व वरील पुरस्काराचा मानकरी ठरला, असे गौरोवोद्‌गार राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे (एनएफसीएफएस) अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी काढले.

दि डेक्कन शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशनच्या (डीएसटीए) ६९ वे वार्षिक अधिवेशन नुकतेच पार पडले. या कार्यक्रमात माळेगाव साखर कारखाना प्रशासनाला ‘बेस्ट शुगर फॅक्टरी’ हा पुरस्कार हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, उपाध्यक्ष तानाजी देवकाते, कार्यकारी संचालक अशोकराव पाटील, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे, रंजनकुमार तावरे, योगेश जगताप, सागर जाधव, बन्सीलाल आटोळे, तानाजी कोकरे, संजय काटे, सुरेश खलाटे, अनिल तावरे, मदनराव देवकाते, दत्तात्रय येळे, प्रताप आटोळे, नितीन सातव, गुलाबराव गावडे, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप, पंकज भोसले, संगीता कोकरे, अलका पोंदकुले, मंगेश जगताप, नितीन जगताप, भीमदेव आटोळे, वर्क्स मॅनेजर अनिल वाबळे, चीफ केमिस्ट विकास फडतरे, डिस्टिलरी मॅनेजर नंदकुमार जगदाळे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

माळेगावचे अध्यक्ष अॅड. जगताप म्हणाले, की शेती आणि शेतीपूरक व्यवसायाला पुढे घेऊन जाणारा माळेगाव कारखाना शेतकरी विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरला आहे. साखर उद्योगामध्ये माळेगाव कारखान्याने इतरांना दिशा देण्याचे काम केले.

सहकारी चळवळीच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्याचे हेतूने माळेगावने साखर निर्मितीबरोबर उपपदार्थ निर्मितीवर लक्ष केंद्रित केले. परिणामी उच्चांकी ऊस गाळप केले. शेतकऱ्यांना राज्यात उच्चांकी दर मिळाला आणि संस्थाही आर्थिक दृष्ट्या सक्षम राहिली. या यशस्वी वाटचालीमध्ये संचालक मंडळ, अधिकारी व कामगारांचा मोलाचा वाटा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Local Body Election: प्रचारात झालेल्या खर्चाची भरपाई द्या

Crop Loan: पीककर्ज वितरणाची गती मंदावली

Agriculture Technology: इक्रिसॅटचे तंत्रज्ञान कृषी विद्यापीठात राबवू

Rabi Crop Insurance: रब्बी हंगामातही पीकविम्याला प्रतिसाद कमीच

Sury Project Canal: सूर्या डावा तीर कालव्याच्या दर्जावर प्रश्‍नचिन्ह

SCROLL FOR NEXT